विजय माल्या आणि किंग फिशर एअरलाईनचा उदय आणि अस्त

Dec 05, 2018, 16:45 PM IST
1/5

विजय माल्या आता बँकांचं कर्ज फेडू शकणार का याबाबत अनेकांना शंकाच आहे. जूनमध्ये कर्नाटकच्या हायकोर्टात अर्ज करताना माल्याने म्हटलं होतं की, त्याची यूबी होल्डींग लिमिटेड आणि इतर कंपन्यांची संपत्ती 13,900 कोटींच्या घरात आहे. त्याने कोर्टात अर्ज केला होता की, ही संपत्ती विकून त्याला कर्ज फेडण्याची अनुमत देण्यात यावी. बँकेच माल्यावर 9000 कोटींचं कर्ज आहे.

2/5

एकेकाळी चांगल्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेली विजय माल्याची किंगफिशर कंपनी डुबल्याने माल्याला मोठा फटका बसला. किंग फिशर एक ब्रँड बनवण्याचं स्वप्न विजय माल्याला पूर्ण करता आलं नाही. माल्याने यासाठी 2007 मध्ये देशातील पहिली लो कॉस्ट एविएशन कंपनी एयर डेक्कनला टेकओवर केलं. यासाठी माल्याने 1,200 कोटी मोजले. 2007 मध्ये केलेला या व्यवहार माल्याला महागात पडला. यानतंर 5 वर्षातच किंग फिशर एअरलाईन्स बुडाली.  

3/5

या व्यवहारामुळे माल्याला सुरुवातीला फायदा झाला. 2011 मध्ये किंगफिशर देशातील दुसरी सर्वात मोठी एविएशन कंपनी बनली होती. पण एयर डेक्कनला खरेदी करण्याचा उद्देश माल्याला खरा ठरवता आला नाही. कंपनीचं मोठं नुकसान झालं. माल्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. यामुळे विजय माल्या मोठ्या अडचणीत सापडला.  

4/5

किंग फिशरच्या दारुचा व्यवसाय हा विजय माल्याला त्याचा वडिलांकडून मिळाला होता. त्याने देशातील प्रतिष्ठीत मॅनेजमेंट संस्थाना निवडलं आणि दारुच्या व्यवसायाला एका कॉरपोरेट कंपनीच्या रुपात बदललं. पण झटक्याने कंपन्या विकत घेण्याची सवय विजय माल्याला भारी पडली.

5/5

एअरलाईन्समध्ये प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी माल्याने महागडी पत्र -पत्रिका मागवली .पण ती गोदामाच्या बाहेर आलीच नाही. कंपनीच्या कमाईवर त्याचा परिणाम झाला. वेळो-वेळी कर्ज घेणाऱ्या माल्या कर्जाखाली बुडाला. कर्ज डोक्यापेक्षा वर गेल्याने अखेर विजय माल्या देशातून फरार झाला.