Pushpa 2 फेम अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना किती शिकलेयत माहितीये?

Allu Arjun Rashmika Mandanna Qualification: तुमच्या आवडत्या कलाकारांचं शिक्षण किती? शाळेपासून महाविद्यालयापर्यंतची सर्व माहिती... 

Dec 06, 2024, 12:25 PM IST

Allu Arjun Rashmika Mandanna Qualification: दाक्षिणात्य कलाजगतात अधिराज्य गाजवत थेट संपूर्ण देशभरात नावलौकिक मिळवणारी नावं म्हणजे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना. 

1/7

पुष्पा

pushpa 2 stars Allu Arjun Rashmika Mandanna Education net worth

'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रदर्शित झाल्या क्षणापासून या चित्रपटानं चाहत्यांच्या मनाता ठाव घेतल्याचं पाहायला मिळालं. 

2/7

रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन

pushpa 2 stars Allu Arjun Rashmika Mandanna Education net worth

रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या लोकप्रियतेमागं कैक कारणं असून, हे कलाकारही त्याच कारणांपैकी एक असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.

3/7

जीवनशैली

pushpa 2 stars Allu Arjun Rashmika Mandanna Education net worth

जेव्हाजेव्हा मोठ्या सेलिब्रिटींची नावं चर्चेत येतात तेव्हातेव्हा त्यांच्या जीवनशैलीविषयी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयीसुद्धा चर्चा होते आणि इथं अल्लू अर्जुन, रश्मिकासुद्धा अपवाद ठरले नाहीत. या कलाकारांच्या शिक्षणाविषयीही जाणून घेण्यात चाहत्यांना उत्सुकता आहे.   

4/7

अल्लू अर्जुन

pushpa 2 stars Allu Arjun Rashmika Mandanna Education net worth

अल्लू अर्जुनविषयी सांगावं तर त्यानं चेन्नईचील सेंट पॅट्रिक स्कूल येथून 12 पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. शालेय जीवनादरम्यान तो जिमनॅस्टीक्स आणि मार्शल आर्ट्सचं शिक्षण घेत होता. यानंतर तो चेन्नईतून हैदराबादला गेला. जिथं त्यानं बीबीएचं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं.   

5/7

रश्मिका

pushpa 2 stars Allu Arjun Rashmika Mandanna Education net worth

1996 मध्ये जन्मलेल्या रश्मिका मंदानानं कर्नाटकातील कोडागू येथील कूर्ग पब्लिक स्कूल येथून शालेय शिक्षण घेतलं. माध्यमिक शिक्षणासाठी ती म्हैसूर येथील इंस्टीट्यूट ऑफ कॉमर्स एंड आर्ट्समध्ये गेली आणि तिथं पुढील शिक्षण पूर्ण केलं. 

6/7

'ब्युटी विथ ब्रेन'

pushpa 2 stars Allu Arjun Rashmika Mandanna Education net worth

रश्मिका 'ब्युटी विथ ब्रेन'चं उत्तम उदाहरण आहे असं म्हणणं गैर नाही. कारण, तिनं बंगळुरूतील एमएस रामैया कॉलेज ऑफ आर्ट्स, साइंस एंड कॉमर्स येथून मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्य या विषयांमध्ये पदवी शिक्षण घेतलं.   

7/7

कलाविश्व

pushpa 2 stars Allu Arjun Rashmika Mandanna Education net worth

थोडक्यात दोन्ही कलाकारांनी कलाविश्वात त्यांचं नशीब आजमवण्यापूर्वी शिक्षणाला प्राधान्य देत शैक्षणिक कारकिर्दसुद्धा चांगलीच गाजवली.