रहस्यमयी खंडोबा मंदिर! सोमवती अमावस्येला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आवर्जून जेजुरीला का येतात?

 Somvati Amavasya : जेजुरी गड हा समुद्रसपाटीपासून 2355 फूट उंचीवर आहे. जाणून घेवूया खंडोबा मंदिराची रहस्ये. 

| Sep 02, 2024, 16:32 PM IST

Somvati Amavasya Pune Jejuri Temple : यळकोट यळकोट जय म्हालार... जेजुरीचा खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. सोमवती अमावस्येला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीला येतात.   सोमवती अमावस्येचे महत्व काय आहे. जेजुरी गडावरील खंडोबाचे मंदिर देखील तितकेच रहस्यमयी आहे. जाणून घेऊया नेमकं काय खास आहे. 

1/8

 जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचं आणि अठरापगड जातीजमातीचे कुलदैवत आहे. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने महाराष्ट्रासह अनेक राज्यातील भाविक येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येतात.

2/8

मनी आणी मल्ल या दोन राक्षसांनी  भगवान ब्रहामाची तपस्या केली. ब्रम्हदेव प्रसन्न झाले. त्यांनी मनी- मल्लला वरदान दिले, त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले. पृथ्वीवर लोकांना ते त्रास देऊ लागले. मनी आणि मल्लाचा नाश करण्यासाठी शंकर खंडेरायाच्या रुपात पृथ्वीवर अवतरेल अशी अख्यायिका आहे.  

3/8

सोमवती अमावस्येला जेजुरीत यात्रा भरते  उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांच्या साक्षीने खंडोबाला कऱ्हानदीवर स्नान घालले. सोमवती अमावस्येला खंडोबाच्या मंदिरात विशेष गर्दी असते. भाविक भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात.

4/8

नवी जोडपी खंडेरायाच्या दर्शनाला गेल्यास पत्नीला उचून देवळात नेण्याची प्रथा आहे.  जेजुरी गावात असलेल्या जेजुरी गडावर खंडोबाचे मंदिर आहे. गडावर चढण्यासाठी 385 पायऱ्या आहेत. या पायऱ्यांसाठी 9 लाख दगड वापरण्यात आले. यामुळे याचा उल्लेख 9 लाख पायरी म्हणून केला जातो. 

5/8

मुख्य मंदिरात मंदिरात खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा यांची मूर्ती आहे. खंडोबाचे हे मंदिर पेशव्यांच्याकाळात बांधले गेले.दगडी दीपमाळा आहेत. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचे प्रतिक आहे. 

6/8

 मंदिराच्या शिखरातील शिवलिंगाला स्वर्गलोक समजले जाते.  मुख्य मंदिरातील स्वयंभूलिंगाला भूलोक आणि गाभार्याितील भुगर्भात असलेल्या शिवलिंगाला पाताळलोक समजले जाते.

7/8

जेजुरीगडावर असलेल्या या खंडोबा मंदिरात गुप्त शिवलिंग आहेत.  वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीला ही गुप्त शिवलिंगे उघडली जातात. 

8/8

पुण्यातील जेजुरीत असलेले खंडोबा मंदिर अत्यंत रहस्यमयी आहे. खंडोबा मंदिराबाबत अनेक अख्यायिका देखील सांगितल्या जातात.