Weekly Numerology : सोमवती अमावस्येने सुरु होणारा आठवडा 'या' मूलांकांच्या लोकांसाठी भाग्यशाली! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 19 to 25 August 2024 In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 2 ते 8 सप्टेंबरपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

नेहा चौधरी | Sep 02, 2024, 15:49 PM IST
1/9

आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असून पैशांचे स्त्रोत वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मर्यादा जाणवणार आहे. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. प्रेमसंबंधातील नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणणारी आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमचे जीवन आनंदी बनवण्याच्या अनेक संधी लाभणार आहे. 

2/9

मूलांक 2

प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम वाढणार असून प्रेम जीवनात आनंद दार ठोठावणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही भविष्याचा विचार करणार आहात. तुमच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित हिताच ठरेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणार आहे. मन प्रसन्न राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी, आपण आपल्या युक्तीने जीवनात आनंद आणि समृद्धी प्राप्त करणार आहात. 

3/9

मूलांक 3

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुमच्या प्रकल्पाचे यश पाहून तुम्हाला समाधान मिळणार आहे. आर्थिक बाबतीत कठोर परिश्रम करून संपत्तीत वाढ होणार आहे. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम वाढणार आहे. प्रेम जीवनात आनंद दार ठोठवणार आहे. या आठवड्यात तुमचे मन प्रसन्न राहणार असून आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. 

4/9

मूलांक 4

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुम्ही तुमच्या प्रकल्पाशी संबंधित प्रवास करणार आहात. तर जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही तुमच्या विचारावर ठाम राहिल्यास चांगले परिणाम मिळणार आहेत. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम तेव्हाच विकसित होईल जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील बंधनातून बाहेर पडण्यास मदत मिळेल. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला आणि आठवड्याच्या शेवटी निर्णय घेतला तर चांगले परिणाम मिळणार आहेत. 

5/9

मूलांक 5

प्रेमसंबंधांमध्ये वेळ हळूहळू अनुकूल असणार आहे. प्रणय हळूहळू तुमच्या प्रेम जीवनात प्रवेश करणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. आर्थिक बाबींमध्ये अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. भावनिक कारणांमुळे अधिक खर्च होणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जीवनात आनंद आणि शांती मिळणार आहे. 

6/9

मूलांक 6

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुमचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत लाभणार आहे. या आठवड्यात प्रेम मजबूत होणार असून तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला खूप लक्ष मिळणार आहे. आर्थिक लाभाच्या शुभ संधीसोबत संपत्तीत वाढ होणार आहे. आठवड्याच्या शेवटी कोणीतरी पुढे येऊन तुम्हाला मदत करणार आहे. 

7/9

मूलांक 7

आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या लव्ह लाईफबद्दल खूप साशंक असणार आहात. पण जर तुम्ही धैर्य दाखवून तुमच्या आयुष्यात पुढे जाल तर वेळ रोमँटिक आणि आनंदी असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला मध्यम यश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी मन अस्वस्थ राहणार आहे. 

8/9

मूलांक 8

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून प्रकल्प तुम्हाला यश देणार आहे. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहणार आहे. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ परिणाम देणारी ठरणार आहे. प्रेमसंबंधातील एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला दु:खी वाटणार आहे. तुम्हाला हवे तसे बदल साध्य करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, नाहीतर त्रास वाढेल. 

9/9

मूलांक 9

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. प्रकल्प हळूहळू यशाकडे वाटचाल करणार आहे. प्रेमसंबंधात एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा मार्ग उघडणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत निष्काळजी राहिल्यास तुमच्या अडचणी वाढणार आहेत. आठवड्याच्या शेवटी आनंद आणि समृद्धीच्या संधी उघडणार आहे. प्रवास यशस्वी सिद्ध होणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)