पार्लरमध्ये जाताय? हे नियम पाळा नाहीतर, सुंदर दिसण्याच्या नादात संकट ओढावून घ्याल

काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अपाय टाळा . 

Sep 16, 2024, 13:18 PM IST

वाढत्या प्रदूषणामुळे चेहरा, केस, त्वचा अशा घटकांची काळजी घेण्यासाठी महिला पार्लर मध्ये जातात. पण योग्य ट्रीटमेंट घेतात का ? 

 

1/8

सेल्फ केअर

पार्लर हा महिलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे . छोट्या- मोठ्या सेल्फ केअर ट्रीटमेंटसाठी महिन्यातून एकदातरी पार्लरची पायरी अनेक महिला चढतात. वाढत्या प्रदूषणामुळे चेहरा, केस, त्वचा अशा घटकांची काळजी घेण्यासाठी महिला पार्लर मध्ये जातात. 

2/8

योग्य ट्रिटमेंटच घ्या

तुम्ही घेत असलेली ट्रिटमेंट योग्य आहे का? हे कसे कळणार? बऱ्याच पार्लरर्समध्ये चुकीच्या सामानाचा वापर केला जातो . सौंदर्य वाढवण्यासाठी पार्लरला जात असाल , तर या गोष्टी लक्षात ठेवा . 

3/8

त्त्वचेचे आजार

या चुका सामान्य असल्यातरी नुकसान फार भयंकर असू शकते. सौदर्य वाढण्याऐवाजी त्त्वचेचे आजार होऊ शकतात. दुर्लक्ष केल्याने  पिंपल्स , रॅशेस् , काळपटपणा आदी  अपाय होऊ शकतात . जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळणे गरजेचे आहे. 

4/8

पार्लरचा मेकअप ब्रश वापरु नका

पार्लरमध्ये दिवसभरात भरपुर लोकं जातात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तोच ब्रश वापरला जातो. सततच्या वापराने ब्रश खराब होतात. एकाच्या चेहऱ्यावर फिरवलेला ब्रश दुसऱ्याच्या फिरवल्यास त्याची अॅलर्जी होऊ शकते. त्यातून त्वचा जर संवेदनशील असेल तर असा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.   

5/8

साहित्य तपासून घ्या

मेकअपचे सामान, सौंदर्य उत्पादके, शॅम्पू, आदी साहित्याचे अत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीचा माल विश्वास ठेवण्यायोग्य नसतो. काही कंपन्या स्वस्त आणि हानिकारक रसायने वापरतात. ज्यांचा त्त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो . वापरा आधी सामान तपासून घ्या आणि प्रमाणित कंपन्यांचाच माल वापरा.   

6/8

पार्लरमधील पंचा न वापरणे

महिला आणि पुरुष दोन्ही पार्लर्समध्ये स्वच्छतेची बोंब असते. कॉटनचे पंचे सतत वापरल्याने त्याचा चेहऱ्यावर अपाय होऊ शकतो. एकाने वापरलेला पंचा शक्यतो दुसऱ्याने कधीच वापरु नये. अशावेळी युज अँड थ्रो टिशूज वापरावेत. 

7/8

स्वच्छतेची काळजी घ्या

जास्त करुन फेशियल, थ्रेडींग, वॅक्सिंग, पेडीक्युअर अशा गोष्टींसाठी महिला पार्लरमध्ये जातात. अशावेळी वापरला जाणारा दोरा, पाण्याचे टब आणि पार्लरमधील लोकांचे हात स्वच्छ असणे फार गरजेचे आहे. या उत्पादकांना स्पर्श करण्याआधी ते तपासुन घ्या. 

8/8

सतर्क घ्या

काही लहान चुका टाळून तुम्ही मोठ्या संकटांपासून सहज वाचू शकता.  मेकअपचे साहित्य रसायनांच्या वापरातून बनलेले असते त्यामुळे काळजी घेणे फारच गरजेचे आहे.