1/7
Birthday Special : पंतप्रधान मोदींच्या जीवनातील 'त्या' कधीही न ऐकलेल्या गोष्टी
असा कोणता स्वातंत्र्यसैनिक होता ज्याच्या अस्थि घेण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडला गेले होते, तेसुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ५६ वर्षांनी. इतकंच नव्हे, तर त्यांच्या स्मरणार्थ मोदींनी त्यांच्याच गावात एका इमारतीचं बांधकामही करवून घेतलं. त्या स्वातंत्र्य सैनिकाचं नाव आहे, श्यामजी कृष्ण वर्मा.
2/7
Birthday Special : पंतप्रधान मोदींच्या जीवनातील 'त्या' कधीही न ऐकलेल्या गोष्टी
परदेशी धरतीवर भारतीय क्रांतीकारकांचे मार्गदर्शक आणि कायम त्यांच्या मदतीला येणारे वर्मा. असं म्हटलं जातं की, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी १९०७ मध्ये सावरकरांना इंडिया हाऊसची जबाबदारी दिली आणि ते पॅरिसला निघून गेले. पहिल्या महायुद्धामध्ये फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये मैत्री झाल्यानंतर ते पत्नी भानुमतीसह स्वित्झर्लंडला निघून आले. जिथं त्यांनी 'सेंट जॉर्ज सीमेट्री' या अस्थि पेढीमध्ये फी देऊन आपल्या आणि पत्नीच्या अस्थिंचं जतन करण्याची विनंती केली. स्वातंत्र्यानंतर कोणी देसभक्त येऊन या अस्थि आपल्या मायदेशी नेईल असा त्यांचा विश्वास होता. पण, स्वातंत्र्यानंतर बऱ्याच सत्ताधाऱ्यांचा याचा विसर पडला. अखेर २२ ऑगस्ट २००३ ला स्वातंत्र्याच्या ५६ वर्षांनंतर मोदींनी त्या दोघांच्याही अस्थि भारतात आणल्या. त्यावेळी ते गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी होते.
3/7
Birthday Special : पंतप्रधान मोदींच्या जीवनातील 'त्या' कधीही न ऐकलेल्या गोष्टी
4/7
Birthday Special : पंतप्रधान मोदींच्या जीवनातील 'त्या' कधीही न ऐकलेल्या गोष्टी
काबुलच्या संसदेत ज्या जाट राजानं दिग्गज भाजप नेता अटल बिहारी वायपेयी यांना हरवलं होतं त्यांची मोदी प्रशंसा करतात. लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणाऱ्या या राजाचं नाव, राजा महेंद्र प्रताप. ते उत्तर प्रदेशमधील हाथरसच्या मुरसान येथील मूळ रहिवासी होते. या राजाला ओळखलं जातं कारण त्यांनी पहिल्यांदाच देशातील अनिवासी सरकारची घोषणा केली होती. अफगाणिस्तानातील काबुल येथे हे सरकार उदयास आलं होतं. संपूर्ण कॅबिनेटसह तयार करण्यात आलेल्या या मंत्रीमंडळामध्ये राष्ट्रपती पद या राजाकडे होतं.
5/7
Birthday Special : पंतप्रधान मोदींच्या जीवनातील 'त्या' कधीही न ऐकलेल्या गोष्टी
6/7
Birthday Special : पंतप्रधान मोदींच्या जीवनातील 'त्या' कधीही न ऐकलेल्या गोष्टी
ज्या काळात गुरु गोलवलकर संघाच्या सरसंघचालक पदी होते, तेव्हा १९६४ मध्ये विश्व हिंदू परिषद सुरु केली जाणार होती. त्यावेळी संघाच्या बड्या सदस्यांनी पुढाकार घेतला. पुढं १९७२ मध्ये विश्व हिंदू परिषदेचं एक मोठं संमेलन गुजरातच्या सिद्धपूर येथे होणार असल्याचं निर्धारित झालं. या संमेलनाच्या आयोजनामध्ये मोदींची महत्त्वाची भूमिका होती. या निमित्तानं नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच संघातील मोठ्या सदस्यांच्या नजरेत कायमचं स्थान निर्माण करुन गेले.
7/7