IPL : आयपीएल इतिहासातील ५ सर्वात महागडे खेळाडू

आयपीएल 2020 (IPL 2020) ची सुरुवात काही दिवसातच होणार आहे. यंदा कोरोनामुळे आयपीएलचा सीजन 13 हा युएईमध्ये होत आहे. जगातील सर्वात मोठी टी20 लीगमध्ये अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होत असतात. ज्यामध्ये खेळाडूंवर करोडोंचा खर्च होतो. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे ५ खेळाडू कोण याबाबत आज आपण पाहणार आहोत.

Sep 16, 2020, 21:41 PM IST

आयपीएल 2020 (IPL 2020) ची सुरुवात काही दिवसातच होणार आहे. यंदा कोरोनामुळे आयपीएलचा सीजन 13 हा युएईमध्ये होत आहे. जगातील सर्वात मोठी टी20 लीगमध्ये अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होत असतात. ज्यामध्ये खेळाडूंवर करोडोंचा खर्च होतो. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे ५ खेळाडू कोण याबाबत आज आपण पाहणार आहोत.

1/5

विराट कोहली -17 कोटी

विराट कोहली -17 कोटी

टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये येतो. कोहलीला 2018 मध्ये आरसीबीने 17 कोटींमध्ये टीममध्ये रिटेन केलं होतं. विराट कोहली या लीगमध्ये सर्वात यशस्वी खेळाडू आहे. कोहली पहिल्या सीजनपासून आरसीबी सोबत आहे.

2/5

युवराज सिंग - 16 कोटी

युवराज सिंग - 16 कोटी

भारतीय क्रिकेट टीमचा माजी ऑलराउंडर युवराज सिंग (Yuraj Singh)याचं नाव देखील या यादीत येतं. युवी आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. 2015 मध्ये आयपीएल सीजन-8 मध्ये दिल्ली डेयरडेविल्सने युवराज सिंगसाठी 16 कोटी रुपये मोजले होते. युवी त्या सीजनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.

3/5

पॅट कमिंस - 15.5 कोटी

पॅट कमिंस - 15.5 कोटी

कोलकाता नाईट रायडर्स (KKR)टीमने मागील वर्षी आयपीएलच्या बाराव्या सीजनमध्ये ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिंस (Pat Cummins) याला 15.5 कोटीला खरेदी केलं होतं. कमिंस मागील वर्षी आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू बनला होता.

4/5

महेंद्र सिंह धोनी - 15 कोटी

महेंद्र सिंह धोनी - 15 कोटी

आयपीएलचा यशस्वी कर्णधार असलेला महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याचं नाव देखील सर्वात महाग खेळाडूंमध्ये येतं. धोनीला 2018 मध्ये आयपीएल फ्रेंचाइजी चेन्नई सुपरकिंग्स (CSK) ने 15 कोटींना रिटेन केलं होतं. आयपीएल सीजन 11 मध्ये धोनाच्या नेतृत्वात सीएसकेने तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती.

5/5

रोहित शर्मा - 15 कोटी

रोहित शर्मा - 15 कोटी

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियंस (MI) संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएल इतिहासातील पाचवा सर्वात महागडा खेळाडू आहे. 2018 मध्ये मुंबई इंडियंसने हिटमॅन रोहित शर्माला 15 कोटीमध्ये रिटेन केलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.