PHOTO : विवेकानंद रॉक मेमोरियल अचानक का आलं चर्चेत? जाणून घ्या भारताच्या दक्षिणेकडील टोकाचे वैशिष्ट्यं

Vivekananda Rock Memorial : निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी खास ठिकाणी जाऊन ध्यान करतात. यंदा ते कुठे ध्यानासाठी बसणार आहे याची चर्चा रंगली आहे. 

May 29, 2024, 10:18 AM IST
1/15

2014 च्या निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रतापगडाला भेट दिली होती. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मोदी केदारनाथच्या रुद्र गुहेत ध्यान केलं होतं. 

2/15

यंदा ते कन्याकुमारी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानसाठी बसणार आहे. 30 मे रोजी रात्री ते तामिळनाडूतील कन्याकुमारीला पोहोचणार आहेत. तिथे ते 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत, स्वामी विवेकानंदांनी ज्या ठिकाणी ध्यानमंडपममध्ये ध्यान करण्यासाठी बसले होते त्या स्थळी ते रात्रंदिवस ध्यान करणार आहेत. 

3/15

विवेकानंद रॉक मेमोरियल हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून सूर्यास्ताचं मनमोहक दृश्यं पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. 

4/15

असं म्हणतात की, 1892 मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले होते. पोहत ते एका प्रचंड खडकावर आले आणि या निर्जन स्थळी ते जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी ध्यानासाठी बसले होते. 

5/15

स्वामी विवेकानंदांचा अमर संदेश प्रत्यक्षात आणण्यासाठी 1970 मध्ये या खडकावर एक भव्य स्मारक इमारत बांधण्यात आली. समुद्राच्या लाटांनी वेढलेल्या या खडकापर्यंत पोहोचणे हा एक वेगळावेगळा अनुभव असतो.   

6/15

स्मारक इमारतीचा मुख्य दरवाजा अतिशय सुंदर असून अजिंठा-एलोरा लेण्यांतील दगडी शिल्पांतून त्याची वास्तू निर्माण झालीय. 

7/15

लाल रंगाच्या दगडाने बनवलेल्या या स्मारकाला 70 फूट उंच घुमट, इमारतीच्या आतील बाजूस चार फुटांपेक्षा उंच व्यासपीठावर परिव्राजक संत स्वामी विवेकानंद यांची आकर्षक मूर्ती तुम्हाला मंत्रमुग्ध करते. 

8/15

पितळेची साडेआठ फूट उंच मूर्ती जणू स्वामींजीचं जिवंत व्यक्तिमत्त्व वाटतं. हे स्मारक जमिनीच्या किनार्‍यापासून सुमारे 500 मीटर अंतरावर समुद्रात असलेल्या दोन खडकांपैकी एकावर बांधलंय.  

9/15

हे स्मारक उभारणीसाठी सुमारे 650 कारागिरांनी 2081 दिवस रात्रंदिवस परिश्रम केलंय. 2 सप्टेंबर 1970 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. व्ही. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखाली या भव्य स्मारकाचे उद्घाटन करण्यात आलं. 

10/15

कन्याकुमारीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. हवेत थोडासा ओलावा आणि थंडगार वाऱ्याची झुळूक मस्त सूर्यास्ताचं दृश्यं मनमोहक असतं. 

11/15

कन्याकुमारीला तुम्ही रेल्वेने जाऊ शकता. त्यानंतर शहरात टॅक्सीने तुम्ही विवेकानंद रॉक मेमोरियलला जाऊ शकता. त्याशिवाय कन्याकुमारी रोड ट्रान्सपोर्टच्या अनेक बस तामिळनाडू, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि बंगलोरहून कन्याकुमारीला जातात. 

12/15

मुंबई आणि बंगलोरहून कन्याकुमारी एक्स्प्रेसनेही तुम्ही जाऊ शकता. कन्याकुमारी रोड ट्रान्सपोर्ट बसेस तामिळनाडू, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि बंगळुरूहून कन्याकुमारीला पोहोचू शकता. 

13/15

तुम्हाला विमानाने जायचं असेल तर कन्याकुमारीचे सर्वात जवळचे विमानतळ त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे कन्याकुमारीपासून 67 किलोमीटर अंतरावर आहे.

14/15

समुद्राने वेढलेले विस्मयकारक वारसा असलेले हे स्मारक एप्रिल महिन्यातील चैत्र पौर्णिमेला चंद्र आणि सूर्य दोघेही एकाच क्षितिजावर समोरासमोर दिसतात.

15/15

विवेकानंद रॉक मेमोरियल हे सकाळी 8 वाजता उघडतं आणि संध्याकाळी 4 वाजता बंद होतं. तर मोठ्यांसाठी प्रवेश तिकीट हे 20 रुपये तर लहान मुलांसाठी 10 रुपये आहे.