Port Blair New Airport: वीर सावरकर नाव अन् शंखाचा आकार; पोर्ट ब्लेअरचं नवं विमानतळ पाहिलतं का?

Port Blair New Airport:  शंखाच्या आकाराचं विमानतळ आजपासून भारतीयांच्या भेटीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या विमानतळाचे उद्घाटन पार पाडले.

| Jul 18, 2023, 19:04 PM IST

Port Blair New Airport Inaugration: शंखाच्या आकाराचं विमानतळ आजपासून भारतीयांच्या भेटीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या विमानतळाचे उद्घाटन पार पाडले.

1/6

वीर सावरकर नाव अन् शंखाचा आकार; पोर्ट ब्लेअरचं नवं विमानतळ पाहिलतं का?

 pm narendra modi inaugurate port blair veer savarkar international airport

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अंदमान-निकोबारच्या पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्धाटन केलं आहे. 710 कोटी रुपये खर्चून हे विमानतळ बांधण्यात आलं आहे. या विमानतळामुळं क्रेंदशासित प्रदेशांचा संपर्क वाढेल. 

2/6

50 लाख प्रवासी

 pm narendra modi inaugurate port blair veer savarkar international airport

जवळपास 40,800 चौरस मीटर एकूण बिल्ट अप क्षेत्रासह नवीन विमानतळावर दरवर्षी जवळपास 50 लाख प्रवासी हातळण्यास सक्षम असेल. 

3/6

80 कोटी रुपये

 pm narendra modi inaugurate port blair veer savarkar international airport

पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चून दोन बोईंग - 767-400 आणि दोन एअरबस-321 या प्रकारांच्या विमानांसाठी उपयुक्त असे एप्रनदेखील बांधण्यात आले आहेत.

4/6

शंखाचा आकार

 pm narendra modi inaugurate port blair veer savarkar international airport

वीर सावरकर विमानतळावर एकाच वेळी १० विमान उतरु शकतात. तसंच, या विमानतळाचा आकार निसर्गाची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला आहे. समुद्र आणि द्विप यांची सांगड घालण्याचा प्रय़त्न केला आहे. विमानतळाची रचना शंखाप्रमाणे बांधण्यात आली आहे. 

5/6

अर्थव्यवस्थेला चालना

pm narendra modi inaugurate port blair veer savarkar international airport

वीर सावरकर विमानतळामुळं केंद्र शासित प्रदेशांतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं म्हटलं जातं. 

6/6

नैसर्गिक सूर्यप्रकाश

 pm narendra modi inaugurate port blair veer savarkar international airport

या विमानतळाची खासियत म्हणजे उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी डबल इन्सुलेटेड छत बसवण्यात आलं आहे. नैसर्गिक सूर्यप्रकाशासाठी जास्तीत जास्त प्रकाश येण्यासाठी प्रकाश व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे.