₹3101 कोटी संपत्ती, लग्नानंतर 14 वर्षांनी घटस्फोट, 'या' हिरोईनला करतोय डेट; Insta पोस्टचे घेतो 5 कोटी

Birthday Special Bollywood News: हा अभिनेता केवळ मनोरंजनसृष्टीमधून कमाई करतो असं नाही. त्याच्या कमाईचे स्रोत काय आहेत हे जाणून घेऊयात.

| Jan 10, 2025, 11:31 AM IST
1/14

hrithikroshanbday

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांमध्ये या अभिनेत्याचा समावेश होतो. हा अभिनेता आहे तरी कोण आणि अभिनय सोडून इतर कोणत्या माध्यमातून करतो कमाई पाहूयात...

2/14

hrithikroshanbday

बॉलिवूडमधील ग्रीक गॉड नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे.   

3/14

hrithikroshanbday

खरं तर हा अभिनेता आज 51 वा वाढदिवस साजरा करत असला तरी त्याची शरीरयष्टी आणि एकंदरित हेल्थ पाहता तो तिशतल्या तरुणांपेक्षाही अधिक तरुण वाटतो.  

4/14

hrithikroshanbday

आपल्या पहिल्याच चित्रपटामधून प्रेक्षकांवर कायमचा प्रभाव पाडणाऱ्या या अभिनेत्याच्या अभिनयाबरोबरच डान्ससाठीही तो प्रचंड लोकप्रिय आहे. त्याने या साऱ्यामधून प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं आहे.  

5/14

hrithikroshanbday

विशेष म्हणजे या अभिनेत्याची एकूण संपत्ती 3101 कोटी रुपये इतकी आहे. यासंदर्भातील वृत्त डीएनएने दिलं आहे. 

6/14

hrithikroshanbday

आजही वयाच्या 51 व्या वर्षी तरुण मुली त्याच्यावर फिदा आहेत. त्याला एक झलक पाहण्यासाठी तरुणी चातकासारख्या वाट पाहतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

7/14

hrithikroshanbday

लग्नानंतर या अभिनेत्याने 14 वर्षांनी घटस्फोट घेतला. आता हा अभिनेता त्याच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट करतोय. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

8/14

hrithikroshanbday

आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे हृतिक रोशन! हृतिक रोशनचा आज 51 वा वाढदिवस आहे. त्याने 2014 साली पत्नी सुझैन खानला घटस्फोट दिला. हे दोघेही त्यांच्या दोन मुलांचं कोपॅरेंटींग करतात.

9/14

hrithikroshanbday

हृतिक सध्या 39 वर्षीय सबा आझादला डेट करतोय तर त्याची पूर्वश्रमीची पत्नी सुझैन खान अर्सलान गोनीला डेट करतोय. 3101 कोटींचा मालक असलेला हृतिक कशी कमाई करतो ते पाहूयात...  

10/14

hrithikroshanbday

चित्रपटांच्या मानधनाबरोबरच इतर अनेक माध्यमांमधून हृतिक कमाई करतो. 2013 मध्ये हृतिकने आपला फिटनेस आणि फॅशन ब्रॅण्ड एचआरएक्स लॉन्च केला. यामध्ये कपड्यांबरोबरच फिटनेससंदर्भातील वस्तू मिळतात. हा ब्रॅण्ड नंतर एवढा मोठा झाला की यामध्ये मित्राने भागेदारी विकत घेतली. या ब्रॅण्डची आजची किंमत 200 कोटी इतकी आहे.

11/14

hrithikroshanbday

हृतिकने आपल्या क्युअर डॉट फिट या स्टार्टअप कंपनीमध्ये 100 कोटींची गुंतवणूक केली आहे. तसेच त्याने इतर फिटनेस स्टार्टअपमध्येही मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला आहे.  

12/14

hrithikroshanbday

हृतिकने अनेक ब्रॅण्डबरोबर करार केले आहेत. यामध्ये रॅडो, ओप्पो, माऊंटन ड्यूसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या प्रत्येक जाहिरातीसाठी हृतिक 3 ते 5 कोटी रुपये मानधन घेतो.  

13/14

hrithikroshanbday

इस्टाग्रामवर हृतिकचे 4 कोटी 47 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इथे प्रत्येक प्रमोशनल पोस्टसाठी तो 4 ते 5 कोटी रुपये मानधन घेतो. हा सुद्धा त्याच्या कमाईचा मोठा स्रोत आहे.   

14/14

hrithikroshanbday

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, हृतिक रोशन प्रत्येक चित्रपटासाठी 65 कोटी ते 75 खोटी रुपये मानधन करतो. फाइटर चित्रपटासाठी हृतिकने 50 कोटी मानधन घेतल्याचं वृत्त आहे.