डेंग्यू रुग्णांमध्ये प्लेटलेट्स झपाट्याने वाढतील, आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश
Platelets Increase: डेंग्यू रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईची पाने प्रभावी ठरतात. पपईच्या पानांमध्ये एंजाइम असतात जे शरीरातील प्लेटलेटची संख्या वाढवतात. यासाठी पपईची पाने धुवून ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. यानंतर ते गाळून घ्या आणि रस वेगळा करा. पपईच्या पानांचा रस कडू असला तरी प्लेटलेट्स झपाट्याने वाढवतो.
Platelets Increase: प्लेटलेटचे प्रमाण कमी असणे हे डेंग्यूच्या सर्वात सामान्य समस्येपैकी एक आहे. डेंग्यू रुग्णांच्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. आहारात अशा कोणत्या पदार्थांचा समावेश केल्याने शरीरातील प्लेटलेट काउंट वेगाने वाढेल? याबद्दल जाणून घेऊया.