दुर्गम भागात अन्न, औषधे पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांनी बनवला अनोखा ड्रोन...!
Unique Drone: माळीण असो किंवा नुकतीच घडलेली इर्शालवाडी मधील घटना असो ,अशा दुर्गम भागात औषधें किंवा काही साहित्य घेऊन जायचे असेल तर प्रचंड अडचणी येतात. हीच अडचण दूर करण्यासाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी अनोखा ड्रोन बनवलाय. चार किलो वजनाचा हा ड्रोन 8 किलो पर्यंत वजन उचलू शकतो. येथे झालेल्या 'सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर इंडिया' साउथर्न सेक्शन ड्रोन डेव्हलपमेंट चॅलेंज (साईस्) या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या (पीसीसीओई) मॅव्हरिकने विद्यार्थी संघाने प्रथम क्रमांक पटकावला.