काय ते नशीब! 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' राजकुमारानं पत्नी म्हणून केली सर्वसामान्य तरुणीची निवड

Brunei Prince Wedding: सध्या जगभरात एका अशा लग्नाची चर्चा सुरु आहे, जिथं वधू कमालीची नशिबवान असल्याचं सांगितलं जात आहे, कारण तिनं चक्क एका राजकुमाराशी लग्न केलं आहे

Jan 15, 2024, 10:51 AM IST

Brunei Prince Wedding: असं म्हणतात प्रेम ही भावनाच अशी आहे, जी अनेकदा तुम्हाला साचेबद्ध जगण्यातून बाहेर काढण्यास कारणीभूत ठरते. अशा या प्रेमाच्या भावनेचं एक सुरेख रुप नुकतंच संपूर्ण जगानं पाहिलं. 

1/7

ब्रुनेईच्या सुलतान हसनल बोल्किया यांचा मुलगा

Photos brunei prince Abdul Mateen marries commoner in lavish wedding ceremony

Brunei Prince Wedding: ब्रुनेईच्या सुलतान हसनल बोल्किया यांचा मुलगा, राजकुमार अब्दुल मतीनचा शाही निकाह नुकताच पार पडला आणि संपूर्ण जगाच्या नजरा या विवाहसोहळ्यावर पडल्या. जगातील सर्वात श्रीमंत शासकाच्या लेकानं नेमकं कोणाला जोडीदार म्हणून निवडलं असेही प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेले. (छाया सौजन्य - सोशल मीडिया)

2/7

सर्वसामान्य तरुणीला जोडीदार म्हणून निवडलं

Photos brunei prince Abdul Mateen marries commoner in lavish wedding ceremony

आश्चर्याची बाब म्हणजे अब्दुल मतीननं कोणा मोठ्या राज्याच्या लेकीला नव्हे, तर एका सर्वसामान्य तरुणीला जोडीदार म्हणून निवडलं आहे. 32 वर्षी अब्दुल मतीननं गुरुवारी यांग मूलिया अनीशा (29 वर्षे) हिच्याशी एका शाही समारंभात निकाह केला. 7 जानेवारीपासून सुरु झालेला त्यांचा हा विवाहसोहळा तब्बल 10 दिवसांसाठी आयोजित करण्यात आला आहे. (छाया सौजन्य - सोशल मीडिया)

3/7

सुलतान हसनल बोल्किया यांचे 10 वे सुपूत्र

Photos brunei prince Abdul Mateen marries commoner in lavish wedding ceremony

प्रिंस मतीन सुलतान हसनल बोल्किया यांचे 10 वे सुपूत्र आहेत. कमाल गोष्ट म्हणजे यांग मूलिया अनीशाचे आजोबा ब्रुनेईच्या सुल्तान यांच्या महत्त्वाच्या सल्लागारांपैकी एक होते. (छाया सौजन्य - सोशल मीडिया)

4/7

अनेक कार्यक्रमांना हजेरी

Photos brunei prince Abdul Mateen marries commoner in lavish wedding ceremony

प्रिंस मतीन सतत चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे ते अनेकदा त्यांच्या वडिलांसोबत दिसतात. 2023 मध्ये ते ब्रिटनचे किंग चार्ल्स आणि कॅमिला यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठीही हजर होते. (छाया सौजन्य - सोशल मीडिया)

5/7

अनेक वर्षांचं नातं

Photos brunei prince Abdul Mateen marries commoner in lavish wedding ceremony

उपलब्ध माहितीनुसार प्रिंस मतीन आणि अनीशा अनेक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करतात. 2023 पासून त्यांचं नातं आणखी घट्ट झालं. त्याचदरम्यान अनीशाला राजकुमारी अज़ेमा निमातुल बोलकियाच्या शाही विवाहसोहळ्यातही पाहिलं गेलं होतं. (छाया सौजन्य - सोशल मीडिया)

6/7

2023 मध्ये नात्याची अधिकृत घोषणा

Photos brunei prince Abdul Mateen marries commoner in lavish wedding ceremony

2023 मध्येच प्रिंस मतीन आणि अनीशा यांच्या साखरपुड्याची अधिकृत माहिती सुलतान हाजी हसनल बोलकिया यांनी एका अधिकृत पत्रकार परिषदेतून दिली होती. (छाया सौजन्य - सोशल मीडिया)  

7/7

फॅन फॉलेइंगही मोठी

Photos brunei prince Abdul Mateen marries commoner in lavish wedding ceremony

प्रिंस सोशल मीडियावर बरेच सक्रिय असल्यामुळं त्यांची फॅन फॉलेइंगही मोठी आहे. अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' म्हणूनही केला जातो. पण, आता मात्र त्यांच्या लग्नानंतर त्यांच्यावर भाळलेल्या अनेकजणींचा प्रेमभंग झाला असं म्हणणं गैर ठरणार नाही. (छाया सौजन्य - सोशल मीडिया)