मोदींच्या उपस्थितीत पार पडलं प्रियांका-निकचं रिसेप्शन

Dec 05, 2018, 16:55 PM IST
1/9

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक विशेष गोष्ट म्हणजे ते कोणत्याही कार्यक्रमात अगदी सहज उपस्थित राहतात. त्यांची ही सहजता सगळ्यांनाच आश्चर्य करणारी आहे. मंगळवारी रात्री असंच काहीसं झालं. जेव्हा प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते. 

2/9

बॉलिवूड ब्युटी प्रियंका चोप्रा हिने अमेरिकन गायक निक जोनससोबत जोधपुरमध्ये लग्न केलं. या लग्नसोहळ्याचं रिसेप्शन नवी दिल्लीत पार पडलं. 

3/9

प्रियंकाने या लग्न समारंभानंतर दिल्लीत रिसेप्शन ठेवलं होतं. यावेळी दोन्ही कुटुंबातील मंडळी उपस्थित होते.       

4/9

ख्रिश्चन लग्नाच्या सोहळ्यात प्रियंकाने हातभर असलेला सफेद रंगाचा गाऊन घातला आहे. ज्याला 75 फूट लांब वेल असून निक सफेद रंगाच्या टूक्सेडोमध्ये दिसत आहे. तर हिंदू लग्नात प्रियंकाने सब्यसाचीचा लाल रंगाचा लेहंगा, चोली आणि दुप्पटा घातला आहे. या दोन्ही लूकमध्ये प्रियंका परीप्रमाणेच दिसत आहे.     

5/9

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांचा 1 आणि 2 डिसेंबर रोजी जोधपुरमधील उमेद भवनात हा विवाह सोहळा पार पडला. या कपलने दोन पद्धतीने विवाह सोहळा केला. 1 डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने हा सोहळा पार पडला तर 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने हा सोहळा पार पडला. 

6/9

प्रियंकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत आहे. आपल्या प्रेमाला नात्याचं नाव देऊन प्रियंका खूप खूष आहे. 

7/9

या रिसेप्शनच्या बॅकग्राऊंडला प्रियंका - निकच्या इनिशिअल अल्फाबेट लेटर लिहिले आहेत. एन आणि पी.... साखरपुड्याच्या समारंभात देखील बॅकग्राऊंड सारखंच होतं.

8/9

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले प्रियंका आणि निक 

9/9

दिल्ली रिसेप्शनमधून न्यूली वेड कपलचे सुंदर फोटो आले समोर