संपूर्ण जगासाठी टाईम बॉम्ब आहे हा डेंजर प्रोजेक्ट! पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली; NASA कडून धोक्याचा इशारा

Three Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा मोठा परिणाम पृथ्वीवर झाला आहे. 

| Jan 08, 2025, 23:29 PM IST

China Three Gorges Dam :  चीन मध्ये जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागला. 1994 मध्ये या धरणाचे बांधकाम सुरू झाले.  2012 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले.  चीनच्या हुबेई प्रांतातील यांगत्से नदीवर बांधण्यात आले आहे.  ही जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे 4 लाख 63 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. जवळपास 14 लाख घरं या धरणाच्या बांधकामामुळे प्रस्थापित झाली. 

1/7

जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. थ्री गॉर्जेस डॅम (Three Gorges Dam) असे या धरणाचे नाव आहे.  

2/7

या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग थोडा कमी झाला आहे.  एका दिवसाचा वेळ सुमारे  0.06  मायक्रोसेकंदांनी वाढला आहे.  

3/7

 या धरणात इतके पाणी जमा झाले आहे की पृथ्वीच्या जडत्वावर याचा परिणाम झाला आहे. 

4/7

हे धरण 2.3 किलोमीटर लांब, 115 मीटर रुंद आणि 185 मीटर उंच आहे.  

5/7

या धरणामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूर गेले आहेत. 

6/7

या धरणामुळे पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड झाला कमी झाला आहे.   

7/7

जगातील सर्वात मोठा जलविद्युत  प्रकल्प याच धरणावर आहे.