10 लोकही खरेदी करेनात 'ही' कार; Maruti ने मिनी-एसयुव्ही म्हणत केली होती लाँच

SUV सेगमेंटमधील लोकप्रियतेमुळे देशात अनेक सब-कॅटेगरीही तयार करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये कॉम्पॅक्ट एसयुव्ही, मिनी एसयुव्ही आणि मायक्रो एसयुव्ही आहेत.     

| Jan 08, 2025, 20:05 PM IST

SUV सेगमेंटमधील लोकप्रियतेमुळे देशात अनेक सब-कॅटेगरीही तयार करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये कॉम्पॅक्ट एसयुव्ही, मिनी एसयुव्ही आणि मायक्रो एसयुव्ही आहेत. 

1/8

भारतीय मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांपासून एसयुव्ही गाड्यांची मागणी वाढत आहे. यामुळेच अनेक कंपन्याही एसयुव्हीला प्राधान्य देत आहेत.   

2/8

SUV सेगमेंटमधील लोकप्रियतेमुळे देशात अनेक सब-कॅटेगरीही तयार करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये कॉम्पॅक्ट एसयुव्ही, मिनी एसयुव्ही आणि मायक्रो एसयुव्ही आहेत.   

3/8

30 सप्टेंबर 2019 ला मारुती सुझुकीने आपली छोटी कार S-Presso ला मिनी एसयुव्ही म्हणत मार्केटमध्ये लाँच केलं होतं. बॉक्सी डिझाईन आणि युनिक लूकमुळे ही कार खूप चर्चेत होती.   

4/8

त्यावेळी कंपनीने रेनो क्विड आणि डॅटसन गो सारख्या कारना स्पर्धा देण्यासाठी ही कार 3 लाख 69 हजारात लाँच केली होती. आता तिची किंमत 4.26 लाख झाली आहे.   

5/8

1.0 लीटर पेट्रोल इंजिन आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये येणारी ही कार बाजारात काही खास कमाल दाखवू शकली नाही. मागील डिसेंबर महिन्यात तिला फार कमी ग्राहक मिळाले.   

6/8

डिसेंबरमध्ये मारुती सुझुकीने S-Presso च्या फक्त 8 युनिट्सची विक्री केली आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात विक्री झालेल्या 60 युनिट्सच्या तुलनेत ही 87 टक्के कमी आहे.   

7/8

विक्रीच्या आकड्यांवरुन या कारसाठी पुढील मार्ग फार खडतर असेल हे स्पष्ट आहे. दरम्यान कंपनी या एसयुव्हीसाठी भविष्यात काय पावलं उचलणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.   

8/8

मारुतीने गेल्या डिसेंबर महिन्यात 1,30,117 गाड्यांची विक्री केली आहे. यामधील 17,336 युनिट्सह मारुती ब्रेजा बेस्ट सेलिंग कार ठरली आहे.