#PriyankaNickWedding : अन् प्रियांका-निक म्हणाले, I Do......

Dec 05, 2018, 09:02 AM IST
1/5

#PriyankaNickWedding : अन् प्रियांका-निक म्हणाले, I Do......

#PriyankaNickWedding 'क्वांटिको गर्ल', 'देसी गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. जोधपूर येथे मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. ख्रिश्चन आणि हिंदू धर्मपद्धतींनुसार प्रियांका निकने लग्नगाठ बांधली. ज्यानंतर सोशल मीडियावर या दोघांनीही चाह्त्यांना फार प्रतिक्षा करायला न लावता त्यांच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले. 

2/5

#PriyankaNickWedding : अन् प्रियांका-निक म्हणाले, I Do......

ख्रिश्चन पद्धतीनुसार विवाहसोहळा पार पडला तेव्हा प्रियांका स्वप्नात येणाऱ्या परीप्रमाणे दिसत होती. तर, निकही अगदी राजकुमाराप्रमाणे दिसत होता. 

3/5

#PriyankaNickWedding : अन् प्रियांका-निक म्हणाले, I Do......

'परिकथेतील राजकुमारा.....' अशाच ओळी या दोघांच्या विवाहसोहळ्यातील क्षण पाहून अनेकांनी म्हटलं. ते दोघंही या खास दिवशी परिकथेतील पात्रांप्रमाणेच दिसत होते. 

4/5

#PriyankaNickWedding : अन् प्रियांका-निक म्हणाले, I Do......

'राल्फ लॉरेन'च्या डिझायनर वेअरमध्ये ते दोघंही सर्वांचच लक्ष वेधत होते. मुख्य म्हणजे विवाहसोहळ्याच्या वेळी निक आणि प्रियांका या दोघांनाही त्यांच्या भावना आवरणं शक्य न झाल्यामुळे अखेर त्यांना रडूच आलं. 

5/5

#PriyankaNickWedding : अन् प्रियांका-निक म्हणाले, I Do......

त्यांच्या लग्नाचे अतिश सुरेख असे फोटो 'पीपल'च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुनही शेअर करण्यात आले. प्रियांकाच्या ख्रिश्चन विवाहसोहळ्याचे फोटो पोस्ट करण्यात आले असले तरीही तिच्या हिंदू विवाहसोहळ्यातील एकच फोटो सध्या प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 'देसी गर्ल'च्या 'देसी' लग्नसोहळ्याच्या फोटोंची.