आता स्मार्टवॉचच्या मदतीने करा रोख रक्कमेचे व्यवहार

एका घड्याळाच्या मदतीने पैसे देऊ शकता किंवा कोणत्याही स्टोअरमधून वस्तू खरेदी करू शकता. 

Mar 11, 2021, 19:09 PM IST

मुंबई  : ह्या पुढे तुम्हाला खरेदीला बाहेर निघतांना रोख रक्कम किंवा क्रेडिट, डेबिट कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही. होय, आता खरंच आपल्याला देय देण्यासाठी मोबाईल काढण्याची देखील आवश्यकता पडणार नाही. आता आपण पेट्रोल भरण्यासाठी फक्त एका घड्याळाच्या मदतीने पैसे देऊ शकता किंवा कोणत्याही स्टोअरमधून वस्तू खरेदी करू शकता. चला तर मग या उत्तम तंत्रबद्दल सविस्त माहिती जाणून घेऊ यात.

1/5

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात डिजिटल पेमेंटच्या (Digital Payment) व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे डिजिटल पेमेंटचे प्रमाण आणखीनच वाढले. गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ही डिजिटल पेमेंट अ‍ॅप युजर्समध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

2/5

आजपर्यंत लोक फक्त टच अँड पे आणि यूपीआय पेमेंट वापरत होते. पण आता घड्याळाच्या मदतीने देखील तुम्ही पेमेंट करु शकता. त्यामुळे याला हातात घालण्यायोग्य पेमेंट डिव्हाइस देखील म्हटले जाते.

3/5

अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अ‍ॅक्सिस बँकेने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हातात घालण्या योग्य डिवाईस पेमेंट सादर केले आहे. ज्यात दोन्ही बँकेने अशी घड्याळ बनवली आहे. जी हातात घालून मशीन जवळ येताच पैसे काढण्यास मदत करेल.

4/5

नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) फोन पेसारख्या व्यवहाराची मर्यादा 2000 हजार रुपयांवरून, 5000 हजार रुपयापर्यंत वाढविली आहे. म्हणजेच, 5000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी आपल्याला पिन टाकण्याची गरज नाही. हातात घालण्यायोग्य डिव्हाइसच्या मदतीनेही देय दिले जाऊ शकते.

5/5

हातात घालण्यायोग्य पेमेंट डिव्हाइसचे तंत्रज्ञान आता भारतात सुरू होत आहे. पण हे तंत्रज्ञान नवीन नाही. अमेरिका आणि युरोपसह बर्‍याच देशांमध्ये स्मार्टवॉचच्या मदतीने पैसे दिले जातात. आँपल आणि सॅमसंग मध्ये स्मार्टवॉचपेमेंट पर्याय आधीपासूनच उपल्बध आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यापासून, बहुतेक लोकांनी डिजिटल आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंटला प्राधान्य दिल आहे.