H3N2 Virus : देशभर नव्या फ्लूची साथ; काय आहे धोका? कशी घ्याल काळजी

देशभर नव्या फ्लूची साथ आली आहे. ‘आयसीएमआर’, ‘आयएमए’च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. H3N2 विषाणूच्या प्रादुर्भावाची, सतत खोकला आणि ताप ही लक्षण आहेत. रुग्णालयात दाखल होण्याचे रुग्माचे प्रमाण अधिक आहे. 

Mar 06, 2023, 00:14 AM IST

'Flu A' subtype H3N2 Virus : देशभरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून फ्लूसदृश लक्षणं असलेल्या आजाराची साथ पसरली आहे. हा फ्लूचाच एक प्रकार असल्याचं आणि 'फ्लू ए' चा उपप्रकार H3N2 या विषाणूमुळे त्याचा प्रादूर्भाव होत असल्याचं आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. सतत खोकला, त्याच्या जोडीला ताप ही या आजाराची लक्षणं आहेत. 

1/10

नियमीत मास्क वापरणे, वारंवार हात धुणे यासारखी खबरदारी घेतली पाहिजे. 

2/10

आरोग्याविभागातर्फे जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. 

3/10

योग्य खबरदारी घेतल्यास यापासून बचाव होऊ शकतो.

4/10

ताप आणि अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घ्यावी. 

5/10

या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत: हवेतून होत आहे. १५ पेक्षा कमी आणि ५०हून अधिक वयाच्या रुग्णांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक आहे. 

6/10

हा आजार जीवघेणा नाही. पण श्वसनमार्गाला संसर्ग होत असल्याने रूग्णालयात दाखल करावं लागू शकतं.

7/10

हा ताप तीन दिवसांनी जातो तर खोकला मात्र तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतो असं आयएमएच्या समितीने म्हटलंय. 

8/10

उपचार करताना सरसकट अँटीबायोटिक्स देऊ नयेत, आणि डॉक्टरांनी सध्या केवळ लक्षणांवर औषधं द्यावी असा सल्ला आयएमएने दिलाय.

9/10

 सर्दी, खोकला, ताप, मळमळ, उलट्या, घसादुखी, अंगदुखी, अतिसार ही या आजाराची इतर लक्षणं आहेत.

10/10

फ्लूच्या इतर उपप्रकारांपेक्षा H3N2 बाधितांचं रूग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण अधिक आहे.