राधिका मर्चंटवर फिदा झाली अरबपती गायिका, हिऱ्याची अंगठी पाहून झाली आश्चर्यचकित

अरबपती गायिका राधिका मर्चंट हिच्यावर झाली फिदा, हिऱ्याची अंगठी पाहून झाली आश्चर्यचकित, शेजारी उभे असलेले अनंत अंबानी बघतच राहिले.

| Oct 16, 2024, 18:59 PM IST
1/7

राधिकाचा वाढदिवस

16 ऑक्टोबर रोजी अंबानी कुटुंबातील धाकटी सून राधिका मर्चंट लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. 

2/7

क्रूझ पार्टी

राधिकाचा मित्र ओरीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यासोबत क्रूझ पार्टीची झलक दाखवली आहे.   

3/7

व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये राधिकाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. पॉप सिंगर केटी पेरी राधिकाचा हात धरून आहे. ती राधिकावर फिदा झाली आहे. 

4/7

हिऱ्याची अंगठी

केटी राधिकाला भेटण्यासाठी स्टेजवरून खाली येते आणि तिचा हात मागते. त्यावेळी ती हिऱ्याची अंगठी पाहून आश्चर्यचकित होते. 

5/7

अनंत बघतच राहिला

राधिकाच्या शेजारी उभे असलेले अनंत अंबानी आणि आकाश अंबानी हे केटीला पाहून हसायला लागले. याचाच व्हिडीओ ओरीने शेअर केला आहे. 

6/7

कमेंट्सचा वर्षाव

ओरीने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून चाहते देखील कमेंट्स करत आहेत. राधिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 

7/7

अनंत-राधिका लग्न

राधिका अनंतचे लग्न 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये पार पडले आहे. यावेळी जगभरातील सेलिब्रिटी या लग्नाला आले होते.