बंदी असतानाही अलिबागमध्ये बैलगाडी शर्यतींचे आयोजन, जिल्‍हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Dec 07, 2020, 16:32 PM IST
1/5

समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतींचे आयोजन

समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतींचे आयोजन

सुप्रीम कोर्टाची बंदी असतानाही अलिबागच्‍या किहीम समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत आवाज फाऊंडेशनने जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली आहे.

2/5

जिल्‍हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जिल्‍हाधिकाऱ्यांकडे तक्रार

बैलगाडी शर्यतींचा व्हिडिओ आवाज फाउंडेशनच्‍या सुमायरा अब्‍दुल अली यांनी शुट केला आहे. याबाबतची तक्रार रायगडच्‍या जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांच्‍याकडे करण्‍यात आली आहे. 

3/5

स्‍पर्धेतील विजेत्‍यांना आकर्षक बक्षिसे

स्‍पर्धेतील विजेत्‍यांना आकर्षक बक्षिसे

बैलगाडी शर्यतींवर या स्‍पर्धेतील विजेत्‍यांना आकर्षक बक्षिसेही दिली जातात. दोन दिवसांपूर्वी किहीम समुद्रकिनारी अशा बेकायदेशीरपणे बैलगाडी स्पर्धा आयोजित करण्‍यात आली होती.

4/5

ठिकठिकाणी स्‍पर्धांचे आयोजन

ठिकठिकाणी स्‍पर्धांचे आयोजन

प्रशासन यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्‍वाचं आहे. अलिबाग तालुक्‍याला बैलगाडी शर्यतींची मोठी परंपरा आहे. दरवर्षी ठिकठिकाणी अशा स्‍पर्धांचे आयोजन केले जात असे.

5/5

सर्वोच्‍च न्‍यायालयाची शर्यतींवर बंदी

सर्वोच्‍च न्‍यायालयाची शर्यतींवर बंदी

2014 मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाने या शर्यतींवर बंदी घातली. त्‍यानंतर या शर्यतींना परवानगी मिळावी अशी स्‍थानिकांचीही मागणी आहे. त्‍यासाठी खूप प्रयत्‍न केले गेले परंतु त्‍यांना यश आलं नाही. त्‍यामुळे आता गुपचूप या स्‍पर्धांचे आयोजन केलं जातं.