2020 या वर्षात Yahoo वर सर्च केले गेलेले टॉप 10 नेते

Dec 07, 2020, 14:27 PM IST
1/10

10. ज्योतिरादित्य सिंधिया

10. ज्योतिरादित्य सिंधिया

ज्योतिरादित्य सिंधिया यांना काँग्रेस सोडून यावर्षी होळीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर देशभरात ते चर्चेत आले होते. कारण हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात होता.

2/10

9. ज्योतिरादित्य सिंधिया यांना काँग्रेस सोडून यावर्षी होळीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर देशभरात ते चर्चेत आले होते. कारण हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात होता.सोनिया गांधी

9. सोनिया गांधी

काँग्रेस पक्षातील नेतृत्त्वाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्ष म्हणून कायम राहतील, असा निर्णय घेण्यात आला होता. त्या दरम्यान त्या चर्चेत आल्या होत्या.

3/10

8. निर्मला सीतारमण

8. निर्मला सीतारमण

लॉकडाऊन दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेज जाहीर केले. यावेळी, त्या चर्चेत आल्या होत्या.

4/10

7. प्रणब मुखर्जी

7. प्रणब मुखर्जी

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 31 ऑगस्ट रोजी निधन झाले. या दरम्यान, प्रणव मुखर्जी यांच्याविषयी बहुतेक गोष्टी सर्च करण्यात आल्या होत्या. 

5/10

6. ममता बनर्जी

6. ममता बनर्जी

लॉकडाऊन दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यात बरेच वाद झाले. केंद्राच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्या म्हणाल्या होत्या की, राज्यात लॉकडाऊनबाबत केंद्र एकटा निर्णय घेऊ शकत नाही.'

6/10

5. अरविंद केजरीवाल

5. अरविंद केजरीवाल

सर्वाधिक शोधल्या गेलेल्या नेत्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पाचव्या क्रमांकावर होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात निवडणुका घेण्यात आल्या आणि यावेळी अरविंद केजरीवाल यांचा मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात आला.

7/10

4. उद्धव ठाकरे

4. उद्धव ठाकरे

सप्टेंबरमध्ये कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यातील वादानंतर उद्धव ठाकरे यांना सर्च केलं गेलं. कंगना रनौतने मुंबईची तुलना पीओकेशी केली, त्यानंतर शिवसेनेने कंगनाच्या विरोधात मोर्चा उघडला होता.

8/10

3. अमित शाह

3. अमित शाह

या वर्षाच्या सुरुवातीस देशभरात सीएएच्या विरोधात आंदोलन सुरु असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चर्चेत आले होते. यानंतर जेव्हा अमित शहा यांना जेव्हा कोरोनाची लागण झाली तेव्हा देखील लोकांनी त्यांच्याबद्दल सर्च केले होते.  

9/10

2. राहुल गांधी

2. राहुल गांधी

सर्वाधिक सर्च केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी दुसर्‍या क्रमांकावर होते. यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधींना पक्षाध्यक्षपदी पुन्हा निवडण्याची मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली होती आणि त्यांची जोरदार चर्चा झाली होती.

10/10

1. नरेंद्र मोदी

1. नरेंद्र मोदी

मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केले तेव्हा लोकांनी त्यांना सर्वाधिक वेळा सर्च केलं. यानंतर संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान मोदी Yahoo सर्चवर सर्वात वर राहिले.