तासाचे 2 कोटी रुपये देतो, फक्त..; गुप्तांगामुळे ऑलिम्पिकबाहेर पडलेल्याला 'तसल्या' कंपनीची जॉब ऑफर

Anthony Ammirati Gets Job Offer After Olympic 2024 Failure: गुप्तांगाचा स्पर्श क्रॉसबारला झाल्याने ऑलिम्पिकमधून बाहेर पडलेल्या या खेळाडूची जगभरामध्ये चर्चा असतानाच आता या खेळाडूला एका कंपनीने कोट्यवधी रुपयांची जॉब ऑफर दिली आहे. नेमकी ही ऑफर काय आहे आणि कंपनीने काय म्हटलंय पाहूयात...

Swapnil Ghangale | Aug 07, 2024, 09:11 AM IST
1/12

Anthony Ammirati Job Offer Olympic 2024

फ्रान्सचा अ‍ॅथलिट अँथनी अमिरती सध्या जगभरामध्ये चर्चेत असण्याचं कारण त्याने पदक जिंकल्याचं नसून तो ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेबाहेरमधून चमत्कारिकरित्या बाहेर फेकला गेल्याचं आहे.   

2/12

Anthony Ammirati Job Offer Olympic 2024

21 वर्षीय अँथनी अमिरती हा नक्कीच यजमान फ्रान्ससाठी यंदा ऑलिम्पिक पदक पटकावेल अशी अपेक्षा असतानाच शनिवारी, 3 ऑगस्ट रोजी पात्रता फेरीमध्ये भलतीच घटना घडली आणि तो स्पर्धेबाहेर गेला त्याच्या गुप्तांगाचा स्पर्श पोलला झाल्यामुळे! पोल व्हॉल्ट प्रकारामध्ये सहभागी झालेल्या अँथनीला पुढील फेरीमध्ये पात्र होता आलं नाही.  

3/12

Anthony Ammirati Job Offer Olympic 2024

ऑलिम्पिकमधील पात्रता फेरीत अ गटामधून पात्रता फेरीत खेळलेल्या अँथनी अमिरतीला 5.60 मीटरची उंच उडी मारत 12 वं स्थान मिळालं. मात्र अँथनी अमिरतीने केलेल्या तिन्ही प्रयत्नांपैकी शेवटच्या प्रयत्नामध्ये विचित्र पद्धतीने तो थोडक्यात पात्र ठरण्यापासून दूर राहिला. त्याच्या या शेवटच्या प्रयत्नाची जगभरात चर्चा असून या नकारात्मक बातमीमधून आता एक सकारात्मक गोष्ट घडली आहे.

4/12

Anthony Ammirati Job Offer Olympic 2024

पोलच्या मदतीने उंच उडी घेण्याच्या या खेळामध्ये अँथनी अमिरतीने पात्र होण्यासाठी 5.70 मीटर उंचीवरील आडवा पोल ओलांडण्याचा प्रयत्न केला.  

5/12

Anthony Ammirati Job Offer Olympic 2024

मात्र अँथनी अमिरतीचा हा प्रयत्न अपयशी ठरला तो त्याचं गुप्तांग अगदी शेवटच्या क्षणी या पोलला लागल्यामुळे! अँथनी अमिरतीचं गुप्तांग उडी मारताना क्रॉसबारला लागलं आणि तो खाली पडला.

6/12

Anthony Ammirati Job Offer Olympic 2024

अँथनी अमिरतीला 5.70 मीटरची उडी यशस्वीपपणे पूर्ण करता आली नाही. त्याचं गुप्तांग क्रॉसबारला लागल्याचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. हाच तो व्हायरल झालेला फोटो.

7/12

Anthony Ammirati Job Offer Olympic 2024

मात्र ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या याच विचित्र घटनेमुळे आता अँथनी अमिरतीला एक भन्नाट जॉब ऑफर आली असून एका तासासाठी त्याला 2 कोटी 10 लाख रुपये देण्यास एक कंपनी तयार झाली आहे.

8/12

Anthony Ammirati Job Offer Olympic 2024

पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळणाऱ्या अँथनी अमिरती 12 व्या स्थानी राहिला. पहिले 10 खेळाडू पात्र झाले. अगदी थोडक्यात अँथनी अमिरतीला स्पर्धेबाहेर पडावं लागलं. पण आता त्याला एका कंपनीने थेट तासाभरासाठी कोट्यवधी रुपये देण्याची ऑफर केली असून ही ऑफरही चर्चेत आहे. नेमकं काय काम अँथनीला करावं लागणार आहे पाहूयात...

9/12

Anthony Ammirati Job Offer Olympic 2024

अँथनी अमिरतीला अडल्ट कंटेटसंदर्भात काम करणाऱ्या 'कॅमसोडा' नावाच्या कंपनीने अडीच लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 2 कोटी 10 लाख रुपयांची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे केवळ तासाभराच्या कामासाठी ही एवढी रक्कम दिली जाणार आहे. 

10/12

Anthony Ammirati Job Offer Olympic 2024

'अस विकली'च्या हाती 'कॅमसोडा'चे उपाध्यक्ष ड्रायन पार्कर यांनी 21 वर्षीय अँथनी अमिरतीला ऑलिम्पिकमधील भल्याच पद्धतीने अपात्र ठरल्याच्या घटनाक्रमानंतर पाठवलेलं ऑफर लेटर सापडलं आहे. भरपूर पैसा कमवायचा असेल तर 'तुला तुझं सामान दाखवावं लागेल' अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली ऑफर समोर ठेवली आहे.

11/12

Anthony Ammirati Job Offer Olympic 2024

'तुला गोल्ड मेडल आणता आलं नसलं तरी आमचे कॅमसोडावरील चाहत्यांकडून तुला गोल्ड मिळू शकतं. तसेच यासाठी तुला तुझ्या शॉर्ट्स परिधान कराव्या लागणार नाहीत. तुझ्याकडे असणारं सारं काही दाखव. जगाला दाखवून दे तुझ्याकडे काय आहे ते,' असा उल्लेख अँथनी अमिरती पाठवण्यात आलेल्या या पत्रात आहे.

12/12

Anthony Ammirati Job Offer Olympic 2024

कंपनीच्या अधिकाऱ्याच्या पत्रावरुन तरी कंपनीला अँथनी अमिरतीबरोबर एखादा बोल्ड व्हिडीओ शूट करायचा आहे असा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. आता हातून पदक गेल्यानंतर खरोखरच अँथनी अमिरती ही ऑफर स्वीकारतो का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.