ब्रिटनचे राजाच नव्हे शाही कुटुंबातील ‘या’ लोकांनाही झालेला कर्करोग!

ब्रिटनची राणी एलिझाबेधच्या निधनानंतर 2022 मध्ये किंग चार्ल्स हे ब्रिटनच्या गादीवर बसले होते. पण त्यांना कॅन्सर झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. फक्त किंग चार्ल्सचं नाही तर ब्रिटनच्या राजघराण्यात कुणाकुणाला कॅन्सर झाला आहे. याबद्दल जाणून घेऊया.

Feb 06, 2024, 17:36 PM IST

बकिंघम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार, चार्ल्स III ( King Charle ) यांना कॅन्सरचं निदान झालं असून त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी किंग चार्ल्स यांना कुणालाही न भेटण्याचा सल्ला दिला आहे. 

 

1/7

ब्रिटीश राजघराण्यातील सुरुवातीच्या सम्राटांपासून ते प्रिन्स चार्ल्स पर्यंत रॉयल कुटुंबातील या सदस्यांना कॅन्सरशी लढावं लागलं आहे.   

2/7

Princess Victoria

राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट यांच्या मुलगी Princess Victoria चा 1901 मध्ये वयाच्या 60 व्या वर्षी स्तनाच्या कॅन्सरने मृत्यू झाला होता. 

3/7

King Edward VII

किंग एडवर्ड यांनी युनायटेड किंगडम आणि ब्रिटीश कालखंडात हे 60 वर्ष सिंहासनाचे वारस होते.   1901 ते 1910 या कारकिर्दीत किंग एडवर्ड यांना 'बेसल-सेल कार्सिनोमा' हा कॅन्सर झाला होता.  पण रेडियमने त्यांचा अल्सर काढला होता. ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार किंग एडवर्ड यांचा मृत्यू कॅन्सरने झाला नसून अपेंडिक्सच्या  शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या संसर्गामुळे झाला होता.

4/7

King George VI

किंग जॉर्ज यांच्या कारकिर्दीचा कालावधी हा 1936 ते 1952 इतका होता.जॉर्ज हे दिवसाला 12 वीड पीत होते असं म्हटलं जातं.ते खुप जास्त प्रमाणात  धुम्रपान करायचे. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांचा  फुफ्फुसाच्या कॅन्सरने मृत्यू झाला होता. किंग जॉर्ज यांच्यावर शस्तक्रिया करुन डावं फुफ्फुसा काढलं होतं. 

5/7

Queen Elizabeth

ब्रिटनची राणी  एलिझाबेधचा  2022 मध्ये मृत्यू झाला होता. संपूर्ण ब्रिटन साम्राज्य यामुळे हादरले होते. राणींचं निधन  हे वृद्धापकालाने झाला असलं  तरी त्यांच्या निधनानंतर  एका अहवालात सांगितल्यानुसार त्यांना मायलोमा कॅन्सर असल्याचं समोर आलं आहे. 

6/7

Sarah, The Duchess of York

Sarah, The Duchess of York या प्रसिद्ध लेखिका आहेत. यांचा रॉयल फॅमिलीसोबत संबंध आहे. राणी एलिझाबेधचा दुसरा मुलगा  प्रिन्स अँड्र्यू, ड्यूक ऑफ यॉर्कची पहिली पत्नी आहे.  Sarah, The Duchess of York यांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं समोर आलं आहे. 

7/7

King Charles III

2022 मध्ये राणी एलिझाबेधच्या मृत्युनंतर King Charles III हे ब्रिटनचे नवीन राजे होते. रॉयल फॅमिलीतून आलेल्या अहवालानुसार किंग चार्ल्स यांना कॅन्सर झाला असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत, तसंच डॉक्टरांनी दिलेल्या सल्यानुसार किंग चार्ल्स यांना इतर लोकांना भेटता येणार नाही.