कलिंगड लाल आणि रसाळ कसं ओळखावा? जाणून घ्या सोपी पद्धत

watermelon: अनेकदा बाजारातून कलिंगड विकत घेताना ते लालसर आहे का?  गोड असेल का? खराब तर नसेल ना आतून? असे अनेक प्रश्न कलिंगड विकत घेताना पडत असतात. पण आता काळजी करु नका, आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यावरुन तुम्हाला सहजरित्या कलिंगड गोड आणि रसाळ आहे की नाही हे ओळखता येणार आहे. 

Feb 06, 2024, 16:27 PM IST
1/7

कलिंगडामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे आढळतात.  जे शरीराला अनेक आजारापासून वाचवतात. टरबूजमध्ये 95% पाणी असते, ज्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता कधीच भासत नाही. 

2/7

परंतु हे फळ प्रत्येकवेळी गोड असेल असं नाही. अनेकदा कलिंगड खरेदी करताना तो गोड असेल की नाही हे आधीच समजून घेता येत नाही. त्यामुळे तो कमी गोडे किंवा लाल नसलेले कलिंगड घरी आणतो. अशा वेळी तुमचा भ्रमनिरास होतो.

3/7

कलिंगडावर काळा डाग किंवा एखदा डाग जरी दिसला तर ते कलिंगड आतून गोड असेल की नाही याची खात्री नाही.

4/7

कलिंगडाचा रंग पूर्णपणे हिरवा असतो किंवा त्यावर हिरवे आणि पिवळे असे दोन्ही पट्टे असतात. गडद हिरव्या रंगाच्या कलिंगड गोड असण्याची शक्यता जास्त असते. पण याच्यापेक्षा  फिकट रंगाचं कलिंगड तितके गोड आणि रसाळ नसते.  

5/7

तुम्ही जर एक लहानसा कलिंगडचा तुकडा कापून मागितला, त्यावरुन संपूर्ण फळ कसं आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. आतल्या बाजूने कलिंगड लाल बुंद असेल तरच तो गोड असण्याची शक्यता आहे. कलिंगड गुलाबी, पांढरे किंवा काळे असेल तर ते गोड नसते. 

6/7

कलिंगड आतून गोड आणि रसाळ असेल आणि त्याचा वास येतो. तसेच ते ताजे दिसते. परंतु कलिंगड खूप जुने असल्यास किंवा आतून खराब असल्यास त्याचा कडवट, आंबट वास येतो. अशा स्थितीत कलिंगड चांगला नाही, तो ओळखायला हवा.

7/7

कलिंगड रवाळ असेल तर ते चवीला चांगले लागते. परंतु ते खूप स्मूद असेल तर किंवा फारच कापसासारखे लागत असेल तर चवीला चांगले लागत नाहीच. पण ते कलिंगड आरोग्यासाठीही फारसे चांगले नसते.