Akshaya Tritiya Rangoli Design : अक्षय्य तृतीयेला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा 'या' सुंदर रांगोळ्या

PHOTO Akshaya Tritiya Rangoli Design : शुक्रवारी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयाचा सण साजरा करण्यात येणार आहे. या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी स्वागतासाठी अंगणात काढा सुंदर आणि सोपी रांगोळी. 

May 09, 2024, 22:57 PM IST
1/7

पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 10 मे रोजी पहाटे 4:16 वाजता सुरु होणार असून 11 मे रोजी पहाटे 2:51 वाजेपर्यंत असणार आहे. 

2/7

या दिवशी गंगेत स्नान, दान, जप, होम, स्वाध्याय, तर्पण करण्यात येतं. या दिवशी केलेल्या गोष्टी या सर्व अक्षय होतात, अशी मान्यता आहे.

3/7

अशी मान्यता आहे की, या दिवशी जर कोणी शुभ कार्य केले तर ती गोष्ट नेहमी प्रगती आणि सुख-समृद्धी आणतं. 

4/7

याशुभ दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच स्वागत करण्यासाठी घराच्या दारात काढा सुंदर रांगोळ्या.   

5/7

या रांगोळीच्या काही खास डिझाईन्स तुम्हाला मदत करतील. या रांगोळ्या घराची सुंदरता वाढवतील. तुमच्या घरावर देवी-देवतांचा आशीर्वाद लाभेल.

6/7

अक्षय्य तृतीयेला विवाहसोहळा, गृहप्रवेश आणि वस्तूंची खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. त्याचबरोबर या दिवशी सोने-चांदी खरेदी केल्याने घरात उत्पन्न वाढतं, अशी मान्यता आहे.

7/7

हिंदू धर्मात रांगोळी हे शुभ आणि स्वागताच प्रतिक मानलं जातं. आजही भारतात दारोदारी रांगोळी काढण्याची प्रथा आहे.