वर्ल्ड कपसाठी नव्या टीमची घोषणाः विराट, रोहितसाठी धोक्याची घंटा, 'या' घातक बॉलरचं कमबॅक

World Cup 2023: यंदाचा वर्ल्डकप भारतात खेळवला जाणार असून सर्व देश त्यांच्या टीमची घोषणा करतायत. अशातच आता अजून एका देशाने त्यांची टीम घोषित केली असून एका घातक गोलंदाजामुळे रोहित आणि विराटचं टेन्शन वाढणार आहे. 

Sep 11, 2023, 12:57 PM IST
1/7

2023 मध्ये भारतात खेळल्या जाणार्‍या वर्ल्डकपवर संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. दरम्यान यावेळी एका खेळाडूने अचानक वर्ल्डकपमध्ये प्रवेश केला आहे. ज्यामुळे या विराट आणि रोहित खेळाडूंना पुन्हा एकदा त्रास होऊ शकतो.  

2/7

न्यूझीलंडच्या टीमने नुकतंच वर्ल्डकपसाठी टीमची घोषणा केली असून त्यामध्ये ट्रेंट बोल्टचा समावेश करण्यात आलाय.   

3/7

विराट आणि रोहित दोन्ही खेळाडूंना डावखुरा वेगवान गोलंदाज खेळताना खूप अडचणी येतात. ट्रेंट बोल्टने या दोन्ही खेळाडूंना अनेक वेळा बाद केलंय.

4/7

न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे, बोल्टने भारताविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 30 सामने खेळले आहेत आणि 77 विकेट्स घेतल्या आहेत.  

5/7

कोहली आणि बोल्ट टेस्टमध्ये 5 वेळा आमनेसामने आलेत. ज्यात बोल्टने कोहलीला 3 वेळा आऊट केलंय. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 पैकी केवळ 3 वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.

6/7

ट्रेंटनेही रोहित शर्माला 4 वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. अशा परिस्थितीत 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत ट्रेंट बोल्ट विराट-रोहितसाठी अडचणीचं कारण बनू शकतो.

7/7

दरम्यान यावेळी न्यूझीलंडच्या टीममध्ये कर्णधार केन विलियम्सनचंही कमबॅक झालं आहे. यावेळी केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग यांचा समावेश आहे.