जीवन यशस्वी आणि समृद्ध बनवतील स्वामी विवेकानंद यांचे विचार

दरवर्षी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी केली जाते. 1984 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 'आंतरराष्ट्रीय युवा वर्ष' घोषित केले.

| Jan 11, 2025, 14:51 PM IST

स्वामी विवेकानंदांचे जीवन प्रेरणास्रोत आहे. त्यांचे विचार आणि भाषणे आजही तरुणांना यशाच्या मार्गावर पुढे जाण्यास शिकवतात. त्यांनी सांसारिक इच्छांचा त्याग केला आणि देव आणि ज्ञानाच्या शोधात आपले जीवन समर्पित केले. त्यांचे मौल्यवान विचार प्रत्येक तरुणाच्या जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करतात. स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणूनही साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद जयंती कधी आहे आणि तिचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.

1/10

कमकुवत विचार तुम्हाला कमकुवत करतील आणि बलवान विचार तुम्हाला बलवान करतील

2/10

स्वतःला घडवण्यात इतके लक्ष द्या की दुसऱ्याचे दोष काढायला तुम्हाला वेळ मिळणार नाही.

3/10

अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.

4/10

स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी आहे.

5/10

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर त्यास अर्थ नाही कारण; सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात फरक आहे  

6/10

संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे.

7/10

जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात 

8/10

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही.

9/10

चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या.

10/10

शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा