ज्यानं शेतकऱ्यांना करोडपती बनवलं, शेवटी त्यानंच रडवलं! टोमॅटोला 1 रुपया भाव मिळाल्यानं संताप

गेल्या तीन महिन्यांपासून दिडशे रुपये दराने विकला जाणारा टोमॅटो शेतकऱ्यांना आता एक ते पाच रुपये किलोने विकाला लागत आहे. लातूरमधल्या एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेला टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला आहे.

Sep 11, 2023, 19:20 PM IST
1/7

tomato price hike

मागच्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना लाखो रूपये मिळवून देणारा टोमॅटो आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

2/7

farmer protest

टोमॅटोला भाव मिळत नसून सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही असे म्हणत लातूरमध्ये एका शेतकऱ्याने आंदोलन केलं आहे.

3/7

Throw away tomatoes

भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने भाजी मंडईत विक्रीसाठी आणलेले टोमॅटो रातोरात रस्त्यावर फेकून दिले आहेत.

4/7

Vegetable markets of Latur

संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत लातूरच्या भाजी मंडईत मोठ्या प्रमाणामध्ये टमाट्याची आवक सुरूच होती. मात्र टोमॅटोला एक रुपये किलो पासून ते पाच रुपये किलो पर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

5/7

farmers anger

तोडणी, वाहतूक याचा खर्चही निघत नसल्यामुळे अनेक शेतकरी संतप्त झाले आणि विक्रीसाठी आणलेले टोमॅटो रस्त्यावर शिकून देऊ सरकारचा निषेध केला.

6/7

latur market

लातूरमध्ये 25 ते 30 किलोच्या कॅरेटला फक्त 120 ते 150 रुपयांचा भाव मिळाल्याचं चित्र आहे. लातूरच्या बाजारपेठेत पाच ते सात हजार क्रेट टॉमॅटोची आवक झाली आहे.

7/7

tomato price

दीड दोन महिन्यापूर्वी 150 ते 200 रुपये किलोनं विकला जाणाऱ्या टोमॅटोचा दर आता भाजी मंडईत एक रुपयांवर आल्याने शेतकरी संतप्त झाला आहे.