PHOTO: रोहित-विराटचं टीम इंडियामधलं भविष्य काय? गौतम गंभीरने थेटच सांगितलं, 'मोठ्या स्पर्धांमध्ये ते...'

Gautam Gambhir: गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षक पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उघडपणे वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. यामध्ये त्याला रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या क्रिकेटमधील भवितव्यासंदर्भात आणि खास करुन त्यांच्या भारतीय संघातील स्थानासंदर्भात सूचक विधान केलं आहे. तो काय म्हणाला आहे पाहूयात...  

| Jul 22, 2024, 18:43 PM IST
1/8

Gambhir On future of Rohit Virat

भारतीय क्रिकेट संघाचं पद पुढील पाच वर्षांसाठी गौतम गंभीरकडे असेल असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी 9 जुलै रोजी जाहीर केलं. तेव्हापासून आता भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज क्रिकेटपटू असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय होणार यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे.  

2/8

Gambhir On future of Rohit Virat

गंभीरच्या नियुक्तीनंतर विराट आणि रोहितसंदर्भातील चर्चेचं कारण म्हणजे दोघांनीही वयाची तिशी ओलांडली असून करिअरच्या उत्तरार्धामध्ये आहेत. गंभीर या दोघांना किती वर्ष संघात ठेवणार की गंभीर आल्यानंतर हे दोघेही कायमचे संघाबाहेर पडणार? असे प्रश्न चर्चेत असतानाच आता थेट गौतम गंभीरने स्वत: सार्वजनिकरित्या विराट आणि रोहितच्या भारतीय संघातील भविष्यावर भाष्य केलं आहे.

3/8

Gambhir On future of Rohit Virat

प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गंभीरने पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या संघातील भविष्यावर भाष्य केलं आहे. रोहित सध्या 37 वर्षांचा असून विराट 35 वर्षांचा आहे. या दोघांना 2027 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये संधी मिळणार की नाही यावरही गंभीरने सूचक विधान केलं आहे.  

4/8

Gambhir On future of Rohit Virat

रोहित शर्माच भारताच्या एकदिवसीय तसेच कसोटी संघाचा कर्णधार म्हणून कायम राहणार आहे. रोहित शर्माच 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार हे निश्चित आहे. तसेच जय शाह यांनी अप्रत्यक्षपणे 2025 साली कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचं नेतृत्व रोहितकडेच राहील असे संकेत दिले आहेत.

5/8

Gambhir On future of Rohit Virat

2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत रोहित शर्मा 40 वर्षांचा होईल तर कोहली 38 वर्षांचा असेल. मात्र या स्पर्धेमध्ये रोहित आणि विराट खेळणार नाहीत असं गंभीर म्हणालेला नाही हे विशेष! गंभीरने तर या दोघांचा 2027 च्या वर्ल्ड कप संदर्भातील प्लॅनमध्ये विचार असल्याचं म्हटलं आहे. 

6/8

Gambhir On future of Rohit Virat

"मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना ते काय मिळवून दाखवू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं आहे असं मला वाटतं. मग तो टी-20 वर्ल्ड कप असो किंवा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप असो," असं गंभीर म्हणाला.   

7/8

Gambhir On future of Rohit Virat

"त्या दोघांनी (विराट आणि रोहितने) त्यांची फिटनेस उत्तम ठेवली तर 2027 च्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये ते खेळू शकतील," असं गंभीरने पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.  

8/8

Gambhir On future of Rohit Virat

"एक गोष्ट फार स्पष्ट आहे की त्या दोघांमध्येही (रोहित आणि विराट) फार सारं क्रिकेट अजून शिल्लक आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ऑस्ट्रेलियन दौऱ्यामधील खेळाने त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंका नाही," असं गंभीरने म्हटलं आहे.