बटाटा आहे की सोनं? 1 किलोची किंमत तब्बल 50 हजार रुपये, असं काय आहे यात खास?

बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते. या बटाट्यातील एक प्रजाती अशी आहे जी तब्बल 50 हजार प्रति किलो प्रमाणे विकली जाते. एवढंच नाही तर हा बटाटा अनेक प्रकारच्या आजारांवर सुद्धा रामबाण इलाज ठरतो. तेव्हा ही बटाट्यांची प्रजाती कोणती तसेच हा बटाटा एवढा खास का आहे याविषयी जाणून घेऊयात.   

Sep 06, 2024, 20:01 PM IST
1/6

जगातील सर्वात महाग बटाटा : 'ले बोनाटे' असे या बटाट्याचे नाव असून हा जगातील सर्वात महाग बटाट्यापैकी एक आहे.  या बटाट्यांची शेती करणे फार अवघड असून याचं पीक खूप मर्यादित प्रमाणात येतं. म्हणूनच हा बटाटा खूप महाग मिळतो.

2/6

फ्रान्सच्या नॉर्मैंडी क्षेत्रामध्ये उगवला जाणारा 'ले बोनाटे' हा बटाटा खूप खास आहे. हा बटाटा इतका नाजूक असतो की त्याला मशीनने नाही तर हाताने खोदून काढावे लागते. हा बटाटा म्हणजे पारंपरिक शेतीचं एक उत्तम उदाहरण आहे यामुळेच हा बटाटा इतर बटाट्यांपेक्षा वेगळा आहे.  

3/6

'ले बोनाटे' या बटाट्यामध्ये अनेक पोषकतत्व सुद्धा आहेत. या बटाट्यामध्ये आढळणारी व्हिटॅमिन्स आणि खनिज याला इतर बटाट्यांपेक्षा वेगळं बनवतात. या बटाट्याचा रंग हलका तपकिरी असतो आणि त्याची चव सुद्धा वेगळी असते.  

4/6

'ले बोनाटे' या बटाट्यामध्ये फायबर, प्रथिने आणि लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स या सारखी विविध जीवनसत्त्वे  आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. हे पौष्टिक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. 

5/6

हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर आणि डायबेटिज सारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा बटाटा उपयुक्त ठरतो. हा बटाटा जवळपास 50 हजार प्रति किलोने विकला जातो. 'ले बोनाटे' बटाटा वर्षातून केवळ 10 दिवसच उपलब्ध होतो. या बटाट्याची साल सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. भारतात या बटाट्याची मागणी कमी असल्याने येथे त्याची शेती केली जात नाही. 

6/6

'ले बोनाटे' बटाट्याचं पीक 50 चौरस मीटरच्या लहान शेतात केली जाते, यासाठी नैसर्गिक खत आणि समुद्री शेवाळ्याचा उपयोग केला जातो. हे बटाटे अतिशय नाजूक असतात त्यामुळे त्यांना हाताने काळजीपूर्वक काढावे लागते. 10000 टन बटाट्यांपैकी केवळ 100 टन बटाटे हे 'ले बोनाटे' जातीचे असतात.