कारकिर्दीच्या टॉपवर असताना 'या' अभिनेत्रीची बॉलिवूडमधून एक्झिट, पण तिच्या बोल्ड लूकवर आजही चाहते फिदा

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीवर आणि आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता त्यांनी स्वत: ला फिल्म इंडस्ट्रीपासून दूर ठेवलं आहे. पण आता 43 वर्षीय अभिनेत्रीने इंडस्ट्री का सोडली याबाबत खुलासा केला आहे. 

| Sep 06, 2024, 19:25 PM IST
1/6

इंडस्ट्रीपासून दूर

43 वर्षाच्या या अभिनेत्रीने देखील कोणताही ब्रेक न घेता इंडस्ट्रीमध्ये काम केलं. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. पण सध्या ही अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दूर आहे. 

2/6

टॉप अभिनेत्रींपैकी एक

आम्ही तुम्हाला सांगतो ही अभिनेत्री आहे शमा सिंकदर. या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शमा सिंकदर ही टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, नंतर तिने स्वत: ला इंडस्ट्रीपासून दूर केले. 

3/6

आरोग्यावर परिणाम

एका मुलाखतीत तिने म्हटले आहे की, काम इतके होते की तिला ब्रेकही मिळाला नाही. या कामाचा तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. 

4/6

डिप्रेशन

मला खूप अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे मी घरीच राहण्याचा निर्णय घेतला.  लोकांना भेटणे पूर्णपणे बंद केले. असं करण्यामागे डिप्रेशन हे एकमेव कारण नाही. यामागे अनेक गोष्टी आहेत. 

5/6

इंडस्ट्री सोडली

जेव्हा मला जळजळ वाटू लागली तेव्हा मी इंडस्ट्री सोडली. स्वत: ला सावरण्यासाठी वेळ काढला. आता शमा पूर्णपणे ठीक आहे. ती सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करत आहे. 

6/6

बोल्ड लुकने चर्चेत

सध्या शमा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सतत चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.