CA ड्रॉपआउट्स साठी करिअरची नवी संधी; पगाराचं पॅकेजसुद्धा वाढेल

CA ड्रॉपआउट्स असणाऱ्यांना त्यासंबंधी विविध कोर्सद्वारे करिअरची नवी संधी उपलब्ध होऊ शकते. 

Jan 18, 2025, 12:20 PM IST

CA ड्रॉपआउट्स असणाऱ्यांना त्यासंबंधी विविध कोर्सद्वारे करिअरची नवी संधी उपलब्ध होऊ शकते. 

1/10

सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA)

सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट हे प्रोफेशनल फायनान्स एक्सपर्ट्स असतात. आर्थिक व्यवस्थापन आणि बजेटिंग मध्ये पारंगत असतात. या कोर्सचा अभ्यासक्रम जवळपास CA च्या अभ्यासरक्रमासारखाच असतो. म्हणून हा कोर्स CA ड्रॉपआउट्स साठी उत्तम पर्याय आहे.  

2/10

सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट (CPA)

हा कोर्स यूएसशी संबंधित असून या कोर्समुळे अमेरिकेत सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट म्हणून काम करण्याची संधी मिळते. सीपीएच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमात CA सारखेच विषय असतात. परंतु, अमेरिकेतील अंकाउंटिंग वर अधिक लक्ष केंद्रित केलेले असते.   

3/10

कंपनी सेक्रेटरी (CS)

कंपनी सेक्रेटरी कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि लीगल कंप्लायन्सच्या संबंधित विषयांशी निगडीत असतात. हा कोर्स मुख्यत: कंपनी कायदा आणि गव्हर्नन्सवर अवलंबून असतो.   

4/10

फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट

फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट हे कंपनीतील वित्तीय व्यवस्थेकडे लक्ष देतात तसेच मूल्यांकन करतात. CA चा अभ्यास करतेवेळी आर्थिक विश्लेषणचा अभ्यास या कोर्सचा अभ्यास करताना अत्यंत उपयुक्त ठरु शकतो.   

5/10

इन्वेस्टमेंट बँकर

इन्वेस्टमेंट बँकर हे कंपनीला भांडवल व्यवस्थापनाशी तसेच गुंतवणूकीशी संबंधित सल्ले देतात. CA च्या अभ्यासाच्या दरम्यान मिळालेले आर्थिक आणि मुल्यांकनाचे ज्ञान हा कोर्स शिकण्यासाठी मदतशीर ठरते.    

6/10

रिस्क मॅनेजमेंट स्पेशालिस्ट

रिस्क मॅनेजमेंट स्पेशालिस्ट हे व्यसायाच्या आर्थिक व्यवस्थापनेतील धोका ओळखून त्याचे निवारण करण्याच्या उद्देशाने मुल्यांकन करतात. CA चा अभ्यास करताना झालेला विश्लेषण आणि प्रोब्लेम सोल्विंग स्कीलचा वापर हा कोर्स शिकताना होतो.   

7/10

टॅक्स कंसल्टंट

टॅक्स कंसल्टंट हे कंपनीला आणि लोकांना टॅक्स प्लॅनिंग आणि कंप्लायंसच्या संबंधित सल्ले देतात. टॅक्सचे पुरेसे ज्ञान हा कोर्स शिकण्यामध्ये यश मिळवून देऊ शकते.  

8/10

मॅनंजमेंट कंसल्टंट

मॅनंजमेंट कंसल्टंट हे कंपनीला आपले ध्येय साध्य करण्याच्या हीशोबाने आणि संचालनात सुधारणा करण्यासाठी योग्य ते सल्ले देतात. प्रोब्लेम सॉल्विंग आणि विश्लेषणात्मक कौशल्य हा कोर्स शिकताना फायद्याचे ठरतात.  

9/10

एंटरप्रेन्योर

CA चा अभ्यास करताना मिळालेले व्यावसायिक आणि आर्थिक व्यवस्थापनाच्या ज्ञानावर आधारित तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुद्धा सुरु करु शकता.   

10/10

डाटा अ‍ॅनालिस्ट

डाटा अ‍ॅनालिस्ट हे माहिती गोळा करुन त्याचे विश्लेषण करुन योग्य ती माहिती पुरवण्यात मदत करतात. या कोर्ससाठी एनालिटीकल आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्कील महत्त्वपूर्ण आहेत.