नवजात बाळाबाबत तुमच्याही मनात आहेत हे '5' गैरसमज ?

Aug 12, 2018, 12:28 PM IST
1/8

Common Myths related to infant babies which everyone should know

बाळाची चाहूल लागली की केवळ गरोदर स्त्री नव्हे तर तिच्या आजूबाजूचीदेखील लोकं तिच्या आरोग्याबाबत पझेसिव्ह होतात. बाळाचा जन्म झाल्यानंतर काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. पण अनेकांच्या मनात नवजात बाळाबाबत काही समज-गैर समज  असतात. तुमच्याही मनात हे गैरसमज असतील तर ते आजच दूर करा. 

2/8

Common Myths related to infant babies which everyone should know

Common Myths related to infant babies which everyone should know

पोटावर झोपणं - जसं प्रौढांना पोटावर झोपणं आरोग्याला त्रासदायक आहे तसेच ते लहान मुलांनाही त्रासदायक आहे. काही मुलांना कुशीवर तर काहींना पाठीवर झोपवलं जातं. मात्र पोटावर झोपणं मुलांंनाही त्रासदायक असल्यास ते कटाक्षाने टाळा. 

3/8

Common Myths related to infant babies which everyone should know

Common Myths related to infant babies which everyone should know

बाळाला सांभाळणारी व्यक्तीशी जवळीक : अनेकदा पालक कामामध्ये व्यस्त राहत असल्याने बाळाला सांभाळण्यासाठी आया किंवा बेबी सिटर ठेवली जाते. बाळाला सांभाळण्यासाठी ज्या व्यक्तीला पैसे दिले जातात त्या व्यक्ती पैशासाठी बाळावर प्रेम करतात, त्या  कधीही सोडून जाऊ शकतील या भीतीपोटी अनेक पालक बाळामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये डीप बॉन्डिंग होऊ देणं टाळतात. मात्र ही चूक आहे. त्या दोघांंमध्ये प्रेम, जिव्हाळा असणं आवश्यक आहे.   

4/8

Common Myths related to infant babies which everyone should know

Common Myths related to infant babies which everyone should know

दूधाची बाटली सुरू झाल्यानंतर स्तनपान नको : यामध्ये बाळाचा मूडही एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. काही मूलं स्तनपानाने तर काही बॉटलने दूध पिणं पसंत करतात. मात्र बाळाच्या विकासासाठी सुरूवातीची काही वर्ष बाळाला स्तनपानाने दूध देणं फायदेशीर ठरतं.   

5/8

Common Myths related to infant babies which everyone should know

Common Myths related to infant babies which everyone should know

बेबी वॉकरने चालायला शिकणं : प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मूल हळूहळू रांगायला आणि चालायला शिकतात. लहानपणी मुलांंचे स्नायू, मांसपेशी नाजूक असतात. अशावेळेस वॉकरमध्ये घालून त्यांना मुद्दामून चालायला लावू नका. यामुळे त्रास होऊ शकतो. 

6/8

Common Myths related to infant babies which everyone should know

Common Myths related to infant babies which everyone should know

खाण्याची सवय : सहा महिन्यांनंतर मुलांंच्या आहारात बदल केले जातात. हळूहळू स्तनपानाच्या दूधासोबतच फळं, भाज्यांचा आहारात समावेश केला जातो. त्रास होत नसल्यास दिवसातून एकदा खिमटीच्या स्वरूपात त्याचा आहाराचा समावेश करा.  

7/8

Common Myths related to infant babies which everyone should know

Common Myths related to infant babies which everyone should know

नवजात बाळ पाहू शकत नाही : नुकत्याच जन्मलेल्या बाळाची दृष्टी परिपक्व झालेली नसते असे काहींना वाटते. मात्र नवजात बाळ धुसर पाहू शकतो. सुमारे 2 आठवड्यात  त्यांना प्रायमरी रंगांची ओळख  होऊ शकते. 

8/8

Common Myths related to infant babies which everyone should know

Common Myths related to infant babies which everyone should know

लहानमुलांंमध्ये नी-कॅप नसते - लहान मुलांंमध्येही नी-कॅप असते. मात्र ती अत्यंत नाजूक असते. लहान मुलांंच्या आरोग्यासाठी, शारीरिक विकासासाठी आवश्यक आहे.