PHOTO : कधी खलनायक, कधी संस्कारी मुलगा! आई आणि बहीण प्रसिद्ध अभिनेत्री, तरी 'हा' चिमुकला आईचे चित्रपट पाहत नाही

Entertainment :  या फोटोमधील चिमुकल्याचा अभिनय अप्रतिम, कधी खलनायक तर कधी संस्कारी मुलगा...त्याने प्रत्येक भूमिकेसाठी चाहत्यांची वाहवाह मिळवली. 

Feb 14, 2024, 08:41 AM IST
1/11

आई, मावशी आणि बहिणी सगळ्या प्रसिद्ध अभिनेत्री...प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पोटी जन्माला आलेल्या या मुलाने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला होता. 

2/11

सिनेमा असो किंवा टीव्ही मालिका त्यांने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली होती. 

3/11

पायलट होण्याचं स्वप्न पाहणारा हा शिरला बॉलिवूडमच्या जगतात. बॉडी बिल्डिंगची अतिशय आवड. असा हा सलमान खानसोबतच्या चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली. 

4/11

आम्ही बोलत आहोत, नूतन यांचा मुलगा आणि तनुजा यांचा भाचा मोहनीश बहलबद्दल. मुंबईत 14 ऑगस्ट 1961 मोहनीश बहलचा जन्म झाला. 

5/11

1983 मधील संजय दत्त आणि पद्मिनी कोल्हापुरीचा बेकरार या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तेरी बनहो में, मेरी अदालत, पुराण मंदिर, इतिहास, मैने प्यार किया, अस्तित्व, फोर्स या सुपरहिट चित्रपटात त्याने काम केलं. 

6/11

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल सलमान खानच्या शिफारशीमुळे मोहनीश बहल याला मैने प्यार किया हा चित्रपट मिळाला. पण नूतन यांच्या मुलाला खलनायकाची भूमिका कशी द्यायची असा प्रश्न सूरज बडजात्या यांना पडला. 

7/11

त्यावेळी सूरज बडजात्याचे आजोबा ताराचंद बडजात्या यांनी नूतनशी संवाद साधला. तेव्हा नूतन यांनी सांगितलं माझ्या मुलगा म्हणून त्याचा कडे न पाहता त्याला जे पात्र तुम्हाला द्यायचे ते द्या. 

8/11

यानंतर मोहनीश बहलची मैने प्यार कियामधील भूमिका चाहत्यांना खूप आवडली आणि चित्रपटही हिट झाला. 

9/11

नूतन यांचे चित्रपट आजही चाहते आवडीने पाहतात, पण मोहनीश कधीही पाहत नाही. कारण आई नतूनशी त्याच खूप भावनिक नातं होतं. त्यामुळे नूतन यांचं चित्रपट पाहून त्यांना अश्रू अनावर होतात. म्हणून ते कधीही आईचे चित्रपट पाहत नाहीत. 

10/11

हम साथ साथ है, हम आपके है कौन या चित्रपटातील भावाची भूमिका पाहून तर चाहते खूप खूष झाले. त्यानंतर छोट्या पडद्यावरील संजीवनीमधील डॉक्टरची भूमिकेने मोहनीशने सर्वांची मनं जिंकली. 

11/11

मोहनीश बहल यांची पत्नी आरतीदेखील अभिनेत्री आहे. या दोघांना दोन मुली असून त्यांच्या मोठ्या लेकीच्या सौंदर्यापुढे प्रसिद्ध अभिनेत्री फिक्या आहे. प्रनूतन ही आजी नूतनची झबी असून 'हेल्मेट' आणि 'नोटबुक' या चित्रपटात झळकली आहे.