तीळ किंवा नारळाचं तेल नव्हे, ऑलिव्ह ऑईलनं करा बॉडी मसाज; पाहा आरोग्यदायी फायदे

ऑलिव्ह ऑईलच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत आपण अनेकदा ऐकले आहे.     

Feb 13, 2024, 15:34 PM IST
1/8

ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी फायदेशीर

ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी उत्तम तेल मानले जाते. विशेष म्हणजे सौंदर्यामध्ये याला विशेष महत्त्व आहे. केसांच्या वाढीसह केस गळणे, कोंडा होणे आणि इतर केसांच्या समस्यांवर ऑलिव्ह ऑईल एक रामबाण उपाय आहे.   

2/8

ऑलिव्ह ऑईलचा का करतात?

त्यामुळे ऑलिव्ह ऑईलचा सर्रास वापर केला जातो. त्याचप्रमाणे त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठीही या तेलाचा वापर केला जातो. पण, केवळ सौंदर्याकरता आणि केसांसाठीच हे लाभदायक नाही. तर आरोग्यासाठी देखील खूपच फायदेशीर आहे. आपण बऱ्याचदा पाहतो की नारळाचे तेल किंवा मोहरीच्या तेलाने आपण आपल्या शरीराचे मालिश करतो. 

3/8

ऑलिव्ह ऑईलचे आरोग्यदायी फायदे

तुम्ही जर मसाज करता ऑलिव्ह ऑईलचा वापर केलात तर त्याचा तुम्हाला खूपच चांगला फायदा होईल. कारण ऑलिव्ह ऑईलने शरीराचे मसाज केले तर त्याचे अनेक फायदे मिळतात. ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्याने मन शांत होण्यास मदत होते. अल्झायमर आणि डिमेंशिया सारख्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.   

4/8

मधुमेहाने ग्रासलेल्या लोकांसाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर

आजकाल मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. दहापैकी आठ लोकं मधुमेहाने ग्रासले आहे. अशावेळी तुम्ही जर ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे मधुमेहाच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीने ऑलिव्ह ऑईलने शरीराला मसाज करणे फायदेशीर ठरते.   

5/8

लिव्ह ऑईलचे गुणधर्म

ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच अनेकांच्या शरीराला सूज येते अशावेळी ऑलिव्ह ऑईलने शरीराचे मसाज केल्यास चांगला फायदा होतो.   

6/8

केसांना होणारे फायदे

ऑलिव्ह ऑईलमध्ये आढळणारे पोषक तत्व केसांसाठी खूपच फायदेशीर असतात. या तेलाने केसांना मसाज केल्यास खूपच फायदा होतो. या तेलाने केसाचा मसाज केल्यास कोंडा, खराब झालेले केस आणि स्प्लिट एंड्सपासून सुटका होण्यास मदत होते. त्यामुळे या तेलाचा केसांसाठी अधिक वापर करावा.   

7/8

निद्रानाशाचा त्रास दुर होतील

तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर वजन वाढण्याचा धोका बळावतो. पण, तुम्ही ऑलिव्ह ऑईलने तुमच्या शरीराचे मालिश केल्यास तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते. तसेच तुमच्या झोपेच्या संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे रात्री झोपताना ऑलिव्ह ऑईलने शरीराला मसाज करणे फायदेशीर ठरते.   

8/8

चेहऱ्याला होणारे फायदे

ऑलिव्ह ऑईलने चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. तसेच त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.