९ वर्षांपूर्वी लावलेल्या चंदनाच्या झाडांमुळे कोट्यावधींचा फायदा

आज शेतीच्या नवीन तंत्रांचा अवलंब करुन शेतकरी व्यापारी होण्याच्या मार्गावर आहेत. 

Aug 11, 2020, 15:09 PM IST

आज शेतीच्या नवीन तंत्रांचा अवलंब करुन शेतकरी व्यापारी होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने निरंतर प्रयत्न करत आहे. पण अनेक शेतरी नवीन तंत्रांचा वापर करून कोटी रूपये कमवत आहेत. 

1/5

चंदनाची लागवड करणारे अल्पेश पटेल

चंदनाची लागवड करणारे अल्पेश पटेल

अल्पेश पटेल गुजरातमध्ये चंदनाची लागवड करतात. चंदनाची लागवड केल्यामुळे येत्या ५ वर्षांमध्ये त्यांना कोट्यावधींचा फायदा होवू शकतो. 

2/5

गुजरात चंदानाच्या शेतीचा केंद्र बनले आहे

गुजरात चंदानाच्या शेतीचा केंद्र बनले आहे

२०११ मध्ये अल्पेश पटेल यांनी भरुच जिल्ह्यातील हंसोट तालुक्यातील कांटासायण गावात चंदनची लागवड केली. गेल्या ९ वर्षांपासून ते चंदनाची लागवड करत आहेत.   

3/5

चंदन लागवडीस प्रारंभ

चंदन लागवडीस प्रारंभ

चंदनाची झाडे विकून अल्पेश सामान्य शेतकरी न राहता लवकरच करोडपती होतील. 

4/5

वैज्ञानिकांकडून मदत

वैज्ञानिकांकडून मदत

अल्पेश पटेल म्हणतात की, जेव्हा त्यांनी चंदनची लागवड करण्यास सुरवात केली तेव्हा त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता.  परंतु कृषी शास्त्रज्ञांच्या मदतीने त्यांची प्रत्येक समस्या दूर झाली.

5/5

पांढर्‍या चंदनापासून होणारी कमाई

पांढर्‍या चंदनापासून होणारी कमाई

अल्पेश म्हणतात की चंदनाच्या एका झाडाची किंमत जवळपास १ लाख रूपये आहे. यानुसार एक हजार झाड विक्री केल्यास कोट्यवधी रुपयांची कमाई होईल.