...रेखा, करिष्मासह आणखीही अभिनेत्रींनी घटस्फोटानंतर नाही केलं दुसरं लग्न

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबाबत चर्चा होऊ लागल्या की अनेकांना उत्सुकता लागते ती म्हणजे अमुक एका सेलिब्रिटीच्या कुटुंबाची, त्यांच्या जोडीदाराबाबतची. हिंदी कलाविश्वात काही सेलिब्रिटींची नाती ही अनेक आदर्श प्रस्थापित करणारी ठरत आहेत. तर, काही सेलिब्रिटींना मात्र या नात्यांमध्ये फारसं यश आलेलं दिसलं नाही. यामध्ये काही अभिनेत्रींची नावं लगेचच पुढे येतात. पण, वैवाहिक आयुष्यात आलेल्या वादळानंतर या अभिनेत्रींनी अद्यापही नव्यानं त्यांचं आयुष्य सुरु केलेलं नाही, अर्थात त्यांनी दुसरं लग्न केलेलं नाही. अर्थात यामागे असणारी खरी कारणं कित्येकदा गुलदस्त्यातच राहिली.

Aug 11, 2020, 13:27 PM IST

मंबई : सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबाबत चर्चा होऊ लागल्या की अनेकांना उत्सुकता लागते ती म्हणजे अमुक एका सेलिब्रिटीच्या कुटुंबाची, त्यांच्या जोडीदाराबाबतची. हिंदी कलाविश्वात काही सेलिब्रिटींची नाती ही अनेक आदर्श प्रस्थापित करणारी ठरत आहेत. तर, काही सेलिब्रिटींना मात्र या नात्यांमध्ये फारसं यश आलेलं दिसलं नाही. यामध्ये काही अभिनेत्रींची नावं लगेचच पुढे येतात. पण, वैवाहिक आयुष्यात आलेल्या वादळानंतर या अभिनेत्रींनी अद्यापही नव्यानं त्यांचं आयुष्य सुरु केलेलं नाही, अर्थात त्यांनी दुसरं लग्न केलेलं नाही. अर्थात यामागे असणारी खरी कारणं कित्येकदा गुलदस्त्यातच राहिली. चला तर, मग जाणून घेऊया या अभिनेत्री आहेत तरी कोण... 

 

1/7

संगीता बिजलानी-

सलमान खान आणि संगीताच बिजलानी यांचं लग्न होता होता राहिलं ही बाब सर्वजण जाणतात. पण, १९९६ मध्ये संगीतानं तेव्हा सर्वांना धक्का दिला जेव्हा तिनं मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केल्याची बाब उघड झाली. जवळपास १४ वर्षांच्या नात्यानंतर संगीताच्या पतीचं नाव बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिच्याशी जोडलं गेलं. अखेर या नात्याला तडा गेला आणि २०१० मध्ये त्या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय़ घेतला. तेव्हापासून संगीता एकटीच राहत आहे.   

2/7

रेखा-

अभिनेता विनोद मेहरासोबत रेखा यांनी लग्न केल्याच्या चर्चा होत्या. पण, रेखा यांनी मात्र ही बाब नाकारल्याचं म्हटलं जातं. व्यावसायिक मुकेश अग्रवाल नावाच्या चाहत्याशी रेखा यांनी १९९० मध्ये लग्न केलं होतं. पण, काही महिन्यांनी रेखा परदेशात असताना मुकेश यांनी आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचं त्यांनी एका चिठ्ठीत लिहिलं होतं. तेव्हापासून रेखा यांच्या आयुष्यात दुसरी अशी कोणतीही व्यक्ती आली नाही, ज्याच्याशी त्या विवाहबंधनात अडकू शकतील.   

3/7

पूजा भट्ट-

२००३ मध्ये पूजा भट्टनं मनीष मखीजा या टेलिव्हिजन शोचं सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीशी आपल्या नात्याची ग्वाही दिली. हे नातं बहरलंही. पण, अखेर २०१४ मध्ये पूजा आणि मनिष वेगळे झाले. पण, त्यानंतर मात्र पूजानं दुसरं लग्न केलं नाही.   

4/7

मनिषा कोईराला-

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संपर्कात आलेल्या नेपाळच्याच बड्या व्यावसायिकाशी म्हणजेच सम्राट दहलशी २०१० मध्ये मनिषा विवाहबंधनात अडकली. २०१२ या वर्षापासून मनिषाच्या या नात्यातही वादळ आलं आणि त्यातच कर्करोंगाचं निदानही झालं. पुढं सम्राट आणि ती वेगळे झाले. मनिषानं कर्करोगावर मात केली पण, पुढं मात्र तिनं दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही.   

5/7

महिमा चौधरी -

२००६ मध्ये व्यावसायिक, आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीशी महिमानं लग्न केलं. दोघांना एक मुलगीही झाली. पण, लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांमध्येच त्यांच्या नात्यात मीठाचा खडा पडला. पुढं २०१३ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय़ घेतला. मुलीची जबाबदारी महिमानं घेतली. पण, दुसऱ्या लग्नाची वाट तिनं धरली नाही.   

6/7

करिष्मा कपूर -

अभिषेक बच्चन याच्यासोबतच्या बहुचर्चित नात्यात दुरावा आल्यानंतर २००३ मध्ये करिष्मानं दिल्लीस्थित व्यावसायिक संजय कपूर याच्याशी लग्न केलं होतं. पुढं २०१४ मध्ये या दोघांनीही घटस्फोटासाठीचा अर्जही दाखल केला. २०१६ मध्ये अधिकृतरित्या ते दोघंही या नात्यातून वेगळे झाले. करिष्माच्या पूर्वाश्रमीच्या पतीनं पुढं लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केलीसुद्धा. पण, बी- टाऊनची ही अभिनेत्री मात्र या वाटेवर गेली नाही.   

7/7

अमृता सिंग-

कुटुंबीयांच्या विरोधाला पत्करत सैफ अली खान यानं आपल्याहून वयानं १२ वर्षे मोठ्या असणाऱ्या अमृता सिंग हिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अमृता त्यावेळी आघाडीची अभिनेत्री होती. १९९१ ला तिचं लग्न झालं. दोन मुलंही झाली, पण हे नातं फार काळ तग धरू शकलं नाही. २००४ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. पुढं सैफनं अभिनेत्री करिना कपूर हिच्याशी लग्न केलं. पण, अमृतानं मात्र आपल्या मुलांच्या संगोपनालाच प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं.