Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी Maruti ने लाँच केली स्वस्त Jimny

Mahindra Thar  XUV कार चांगलीच लोकप्रिय झाली आहे. Mahindra Thar  ला Maruti Jimny टक्कर देत आहे. 

वनिता कांबळे | Dec 04, 2023, 18:24 PM IST

Maruti Jimny Thunder Edition:  सध्या मार्केटमध्ये Mahindra Thar ही XUV कार धुमाकूळ घालत आहे. Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी Maruti ने आपल्या Jimny या XUV कारचे बजेट व्हर्जन लाँच केले आहे. जाणून घेवूया Maruti Jimny Thunder Edition चे बेस्ट फिचर्स आणि किंमत.

 

1/7

Maruti Jimny ही ऑफ-रोड एसयूव्ही आहे.  मारुती सुझुकीच्या जिमनीने एक स्वस्त व्हेरिएंट लाँच केला आहे.

2/7

Zeta आणि Alpha यांच्या किंमती अनुक्रमे  10.74 लाख आणि 14.05 लाख रुपये अशा आहेत.

3/7

Maruti Jimny Thunder Edition ही कार  Zeta आणि Alpha या दोन ट्रिममध्ये ऑफर केली आहे.  

4/7

Maruti Jimny Thunder Edition मध्ये पावर आणि मायलेज या दोन्ही गोष्टी मिळतात. याचे मायलेज 16.94 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत आहे.

5/7

Jimny Thunder Edition मध्ये कंपनीने डिझाईनमध्ये अनेक बदल केले आहेत. याचा   साइड डोअर क्लेडिंग, फ्रंट स्किड प्लेट, डोअर सिल गार्ड आणि विशेष ग्राफिक्स आहेत. 

6/7

लुक आणि फिचर्स पाहता Jimny ची किंमत जास्त असल्यामुळे ग्राहकांचा याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  मारुतीने Jimny Thunder Edition लाँच केले आहे.   

7/7

ऑफ-रोड एसयूव्हीमध्ये महिंद्रा थार ही ग्राहकांची पहिली पसंती आहे. यामुळेच महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी मारुती कंपनीने Jimny ही ऑफ-रोड एसयूव्ही लाँच केली.