Manish Malhotra Diwali Party : रवीना टंडनच्या लेकीसमोर फिक्या पडल्या सुहाना खान आणि खुशी कपूर

  दिवाळी काही दिवसांवर असतानाच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं त्याच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केलं. या पार्टीत बॉलिवूडचे बडे कलाकार दिसले. मात्र, सगळ्यांच लक्ष वेधलं ते म्हणजे स्टारकिड्सनं खुशी कपूर, राशा थडानी, अनन्या पांडे हे सर्व स्टार किड्स फारच सुंदर दिसत होते, पण राशा थडानीनं सगळ्याचा लक्ष वेधले. चला तर पाहुयात या स्टारकिड्सचे फोटोज...

| Oct 23, 2024, 16:28 PM IST

बॉलिवूडच्या स्टार किड्सची दिवाळी पार्टी:  दिवाळी काही दिवसांवर असतानाच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं त्याच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केलं. या पार्टीत बॉलिवूडचे बडे कलाकार दिसले. मात्र, सगळ्यांच लक्ष वेधलं ते म्हणजे स्टारकिड्सनं खुशी कपूर, राशा थडानी, अनन्या पांडे हे सर्व स्टार किड्स फारच सुंदर दिसत होते, पण राशा थडानीनं सगळ्याचा लक्ष वेधले. चला तर पाहुयात या स्टारकिड्सचे फोटोज...

1/8

दिवाळी पार्टीमध्ये स्टार किड्सचा मेळावा

जान्हवी कपूर, खुशी कपूर, राशा थडानी, अनन्या पांडे, सुहाना खान, अलीजेह अग्निहोत्री, राशा थडानी या सर्व स्टार किड्स पारंपारिक वेषात दिसले. 

2/8

सुहाना खान

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा लुक सर्वात वेगळा होता. सुहानाने मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये लाल रंग निवडला.   

3/8

श्रद्धा कपूरचा साडीतील लूक

'स्त्री 2' यशानंतर श्रद्धा कपूर सतत चर्चेत आहे. श्रद्धा कपूरनं दिवाळी वाईब मॅच करण्यासाठी यावेळी गोल्डन रंग निवडला आहे. 

4/8

अनन्या पांडेची बहीण

चंकी पांडेची पुतणी अलाना पांडेने सुद्धा यावेळेस ग्लॅमरस अंदाज दाखवला. नुकतीच आई झालेली अलाना एकदम फिट आणि सुंदर दिसत होती. तिच्या सोबत तिचा नवरा देखील यावेळी दिसला.  

5/8

अलीजेह अग्निहोत्री

सलमान खानची भाची अलीजेह अग्निहोत्रीनं मनीष मल्होत्राच्या पार्टीसाठी गोल्डन आउटफिट निवडला होता. सलमान खान त्याला मिळणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत आहे. यात सलमान खान तर पार्टीमध्ये येऊ शकला नाही पण त्याची बहीण अर्पिता खान व तिचा नवरा आयुष सोबत दिसली.

6/8

खुशी कपूरची जाळीदार साडी

एकदा पुन्हा जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरनं आपल्या ड्रेसिंग सेंसनं सगळ्यांना मागे सोडलं. तिनं ग्लॅमरस अंदाजासाठी काळ्या रंगाची साडी निवडली ती साडी जाळीदार पॅटर्नमध्ये होती.  

7/8

अनन्या पांडे पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये

पांढऱ्या साडीमध्ये चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे खूपच सुंदर दिसत होती. तिच्यावर पांढरा रंग खुपच उठुन दिसत होता. 

8/8

लेहेंग्यामध्ये राशा थडानी

स्टारकिड्समध्ये सगळ्यात लहान राशा थडानी सुध्दा या पार्टीचा भाग झाली. राशानं अजून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नाही, तरी सुद्धा रवीना टंडनची मुलगी ही आता पासूनच चर्चेत आहे. ती तिच्या लूकमुळे नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. तिच्या या वेगळ्या लेहेंगामध्ये सगळ्यांनाचं मागे टाकले.