रोज Unknown नंबरवरुन तिला यायचे 100 Calls! पतीच कॉल करत असल्याचं उघड; कारण ऐकून पोलीस थक्क

Man Calling Wife More Than 100 Times A Day: या महिलेला दिवसभरातून 100 हून अधिक वेळा ब्लँक कॉल यायचे. तिने फोन उचलल्यावर समोरुन कोणीच काही बोलायचं नाही. अनेक आठवडे सुरु असलेल्या या प्रकाराचा भांडाफोड झाला तेव्हा या महिलेला धक्काच बसला. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात...

| Sep 18, 2024, 17:49 PM IST
1/9

 japanpolice

या प्रकरणाला उलगडा झाल्यानंतर खरं कारण समोर आल्यावर पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. नेमकं घडलं काय आणि हे असं या महिलेबरोबर का होत होतं पाहूयात संपूर्ण घटनाक्रम....

2/9

 japanpolice

आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. अशापद्धतीने आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष केलं तर नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते. मात्र त्याचवेळी आपल्या जोडीदाराची अती काळजी करणे किंवा त्याच्याबद्दल फार पझेसिव्ह होणंही धोकादायक असतं.   

3/9

 japanpolice

एका मर्यादेपेक्षा आपल्या जोडीदाराबद्दल जास्त काळजी केली तर त्यामधून नवीन समस्या निर्माण होऊ शकते. असाच काहीसा प्रकार नुकताच जपानमधील एका जोडप्याबरोबर घडला आहे. सध्या ही घटना जगभरामध्ये चर्चेत असून नवऱ्याची वागणूक चर्चेचा विषय ठरतेय. नक्की घडलंय काय? त्याचं कारण काय जाणून घेऊयात...  

4/9

 japanpolice

जपानमधील जे प्रकरण चर्चेत आहे त्यामध्ये पती रोज त्याच्या पत्नीला 100 वेळा कॉल करायला. विशेष म्हणजे पत्नीने उत्तर दिलं नाही तर हा व्यक्ती अनोळखी क्रमांकावरुन पत्नीला कॉल करायचा. खरं तर दिवसातून पत्नीला एकाहून अधिक वेळ कॉल करणं सामान्य बाब आहे. मात्र या प्रकरणातील व्यक्ती पत्नीला इतक्या वेळा कॉल करायचा की ती वैतागून जायची. ही महिला या अनोळखी कॉल्सला एवढी वैतागली की तिने या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेताल. पुढे जे काही झालं त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि त्याने फारच वेगळ वळण घेतलं.  

5/9

 japanpolice

समोर आलेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय पुरुष त्याच्या पत्नीला दिवसातून 100 वेळा कॉल करायचा. पत्नीने फोन उचलल्यानंतर तो तिच्याशी काहीच बोलायचा नाही. हा सारा प्रकार आमागासाकी शहरामध्ये घडला. मात्र अनोखळी क्रमांकावरुन येणारे फोन आपला पतीच करत असल्याची कल्पना या महिलेला नव्हती कारण समोरुन कोणी काही बोलायचंही नाही. 

6/9

 japanpolice

बरेच आठवडे हा प्रकार सुरु राहिल्यानंतर अखेर ही महिला वैतागली आणि तिने संतापून तक्रार करण्याचं ठरवलं. विशेष म्हणजे तिच्या एक गोष्ट लक्षात आली की ती घरी असताना किंवा तिच्या पतीच्या मोबाईलवर गेम खेळत असताना तिला कधीच असे कॉल यायचे नाहीत. त्यामुळे तिला पतीवरच शंका आली.  

7/9

 japanpolice

त्यानंतर या 31 वर्षीय महिलेने पोलिसांकडे या अनोखळी फोन कॉलबद्दल तक्रार नोंदवली. तसेच तिने या प्रकरणी आपल्याला पतीवर शंका असल्याचंही पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी सदर प्रकरणामध्ये चौकशी सुरु केली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी पतीच या महिलेला कॉल करत असल्याचं तिला सांगितलं.   

8/9

 japanpolice

जपानमधील रेकी करण्याविरोधातील कायद्यानुसार पीडितेचा पती असूनही जापानी कायद्यानुसार त्याला पोलिसांनी अटक केली. मात्र तो असं का करत होता याबद्दल जेव्हा त्याला पोलिसांनी विचारलं तेव्हा त्याने दिलेलं कारण ऐकून पोलिसांना धक्का बसला.  

9/9

 japanpolice

पत्नीला अनोखळी क्रमांकावरुन फोन करण्यासंदर्भातील कारण विचारलं असता या व्यक्तीने, माझं माझ्या पत्नीवर फार प्रेम आहे. ती फावल्या वेळात इतर कोणाशी बोलू नये आणि सतत तिचा फोन व्यस्त रहावा म्हणून मी असे कॉल करायचो, असं सांगितलं. पोलिसांनी या हा असला प्रकार आमच्या शहरामध्ये पहिल्यांदाच घडल्याचं सांगितलं. आरोपीने सांगितलेलं कारण ऐकून पोलीसही थक्क झाले. (सर्व फोटो प्रातिनिधिक सौजन्य - रॉयटर्स आणि फ्रीपिकवरुन साभार)