'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीला मिळाला महत्त्वाचा पुरस्कार, म्हणाली 'त्या पुण्याईमुळेच...'

प्रियदर्शनी इंदलकरला एका महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तिने पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

Jan 06, 2024, 21:57 PM IST
1/7

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे प्रसिद्धीझोतात

maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar receive savitrichi lek 2024 award share photo

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून प्रियदर्शनी इंदलकरला ओळखले जाते. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. 

2/7

‘अफलातून लिटील मास्टर्स’मधून सिनेसृष्टीत पदार्पण

maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar receive savitrichi lek 2024 award share photo

प्रियदर्शनीने ‘ई टीव्ही मराठी’ या वाहिनीवरील ‘अफलातून लिटील मास्टर्स’ या कार्यक्रमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. आता नुकतचं तिला एका महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

3/7

'सावित्रीची लेक' पुरस्काराने सन्मान

maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar receive savitrichi lek 2024 award share photo

प्रियदर्शनी इंदलकरला यंदाच्या सावित्रीची लेक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने याबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

4/7

पोस्ट शेअर व्यक्त केल्या भावना

maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar receive savitrichi lek 2024 award share photo

“व्हयं, मी सवित्रीची लेक! ३ जानेवारी ला, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त, ज्ञान Foundation कडून मला “सावित्रीची लेक २०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, असे प्रियदर्शनीने म्हटले आहे. 

5/7

सावित्रीबाईंची चिरी लावून स्विकारला पुरस्कार

maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar receive savitrichi lek 2024 award share photo

"सोनाली कुलकर्णीच्या पोस्ट वरुन प्रेरणा घेऊन, हा पुरस्कार स्विकारताना, मी सावित्रीबाईंची चिरी लावून गेले आणि ताईने लिहीलेल्या ओळी देखील मनोगतात व्यक्त केल्या", असेही ती म्हणाली. 

6/7

मनापासून आभार

maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar receive savitrichi lek 2024 award share photo

"स्वतःला “सावित्रीची लेक“ म्हणवुन घेताना ही चिरी माझ्यातल्या स्वाभिमानाला आणखीन प्रोत्साहन देत होती. श्रीपाल सबनीस, मनोहर कोलते यांचे मनापासून आभार!", अशा शब्दात तिने आभार व्यक्त केले.

7/7

फोटो केले शेअर

maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar receive savitrichi lek 2024 award share photo

"हास्यजत्रेमुळे मी घराघरात पोहोचते आहे आणि हास्यजत्रेच्या पुण्याईमुळे असे पुरस्कार माझ्या पदरी पडत आहेत. धन्यवाद सचिन मोटे, सचिन गोस्वामी, सोनी मराठी, अमित फाळके", असे तिने या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे. तिने या पोस्टबरोबर काही फोटोही शेअर केले आहेत.