अयोध्येला मुघल साम्राज्याकडून 'या' हिंदू राजाने जिंकल, रचला मंदिराचा पाया
Ayodhya Ram : राम लला यांचा प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला अयोध्येत होणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यासाठीही ही अभिमानाची वेळ आहे. कारण 1742 मध्ये अमेठीचे राजा गुरुदत्त सिंग यांनी रामजन्मभूमी मुघलांपासून मुक्त करण्यासाठी लढा दिला होता.
Ram Mandir Pran Pratishta : अयोध्येत 22 जानेवारी रोडी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या क्षणाला ऐतिहासिक क्षण बनवण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेता आणि महत्त्वाच्या व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत या सोहळ्याबाबत मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीसाठी देखील ही अभिमानाची वेळ आहे कारण 1742 मध्ये अमेठीचे महाराज राजा गुरुदत्त सिंह यांनी रामजन्मभूमी मुघलांपासून मुक्त करण्यासाठी लढा दिला होता. राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी अमेठीतील लोक महाराज राजा गुरुदत्त सिंह यांची आठवण काढत आहेत.