Maharashtra Day : महाराष्ट्राच्या संस्कृतीवरुन प्रेरणादायी ठरतील ही 10 मुलांची नावे

Maharashtra Day : मुलांसाठी महाराष्ट्राची संस्कृती जपली जाणारी नावे आणि अर्थ 

| May 01, 2024, 12:21 PM IST

आज महाराष्ट्रात 'महाराष्ट्र दिन' हा उत्साहात साजरा केला जात आहे. असं असताना जर 1 मे रोजी तुमचया घरी गोंडस बाळाचा जन्म झाला असेल तर तुम्ही त्याच्यासाठी खालील नावे निवडू शकता. या नावांमध्ये दडला आहे अतिशय सुंदर अर्थ. महाराष्ट्राची संस्कृती जपली जाणारी ही नावे आहेत अतिशय खास आहेत. तर तुम्ही खालील नावांचा नक्की विचार करा. 

1/10

अद्वैत

10 Beautiful Baby Names inspired by Culture of Maharashtra

धार्मिक आणि युनिक असं मुलाचं नाव 'अद्वैत'. संस्कृतमधील या नावाचा अर्थ आहे अनन्य, ब्रह्मा आणि विष्णूचे दुसरे नाव, द्वैत नसलेले, अद्वितीय, अनन्य, कोणीही समतुल्य, अतुलनीय, अतुलनीय. या नावामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दडला आहे. 

2/10

निहारिका

10 Beautiful Baby Names inspired by Culture of Maharashtra

महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय नाव असं 'नाहारिका' आहे. पहिल्या पावसाचा थेंब, धुकं असा या नावाचा अर्थ आहे. पावित्र्य असा देखील या नावाचा अर्थ आहे.

3/10

ध्रुव

10 Beautiful Baby Names inspired by Culture of Maharashtra

ध्रुव ताऱ्यापासून मुलाचं हे नाव लोकप्रिय आहे. या नावाचा अर्थ आहे अति हुशार; अचल; ध्रुव तारा. महत्त्वाचं म्हणजे स्थिरता आणि सुसंगतता हे गुण ध्रुव नावाच्या मुलामध्ये असतात. 

4/10

ऐश्वर्या

10 Beautiful Baby Names inspired by Culture of Maharashtra

ऐश्वर्या या नावामध्ये 'संपत्ती' आणि 'समृद्धी' हे अर्थ दडलेले आहेत. ऐश्वर्या हे महाराष्ट्रातील लोकप्रिय मुलींचं नाव आहे. तसेच विश्वसुंदरी असलेल्या ऐश्वर्याचं नाव देखील अनेकांना आवडतं. 

5/10

सिद्धार्थ

10 Beautiful Baby Names inspired by Culture of Maharashtra

सिद्धार्थ हे नाव संस्कृत शब्द 'सिद्ध' या नावावरुन तयार करण्यात आलं आहे. ज्ञान असा या नावाचा अर्थ आहे. सिद्धार्थ नावाचा अर्थ आहे लक्ष्य. भगवान बुद्धांचे नाव आहे सिद्धार्थ. महाराष्ट्रात भगवान बुद्धांना मानणारा मोठा वर्ग आहे. 

6/10

अनन्या

10 Beautiful Baby Names inspired by Culture of Maharashtra

अनन्या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. युनिक आणि अतिशय प्रेमळ असा या नावाचा अर्थ आहे. अनन्या हे नाव चारचौघात उठून दिसतं. महत्त्वाचं म्हणजे या नावाचा अर्थ सुंदर तारा, देवी पार्वतीचे रुप असे देखील याचे अर्थ आहे. 

7/10

शंतनू

10 Beautiful Baby Names inspired by Culture of Maharashtra

शंतनू हे नाव देखील महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय नाव आहे. 'आरोग्यदायी' आणि 'शांतता' असा या नावाचा अर्थ आहे. शांतता प्रेमळ, निरोगी असा देखील याचा अर्थ होतो. 'शंतनू' आणि 'शांतनू' असं देखील हे नाव उच्चारू शकतात. 

8/10

कावेरी

10 Beautiful Baby Names inspired by Culture of Maharashtra

कावेरी नावाची नदी महाराष्ट्रातून वाहते. या नदीचं महाराष्ट्रात एक वेगळं स्थान आहे. कावेरी हे तीन अक्षरी नाव अतिशय लोकप्रिय आहे. कावेरी या नावातून महाराष्ट्रातील संस्कृतीचं दर्शन होतं. त्यामुळे मुलीसाठी हे नाव नक्कीच निवडा. 

9/10

अर्जुन

10 Beautiful Baby Names inspired by Culture of Maharashtra

अर्जुन हे महाभारतातील अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. अर्जुन हे नाव शुरता, संकल्प, धाडसी असा या नावाचा अर्थ आहे. मुलासाठी अर्जुन हे निवडल्याने त्याच्यामध्ये असे सर्व गुण येतात. 

10/10

आराध्या

10 Beautiful Baby Names inspired by Culture of Maharashtra

आराध्या हे देखील तीन अक्षरी उत्तम नाव आहे. या नावाचा अर्थ आहे प्रार्थना, पूजा आध्यात्मिक असा देखील याचा अर्थ आहे. भक्ती भाव या नावामध्ये खच्चून भरला आहे. महाराष्ट्राला आध्यात्मिकतेची परंपरा आहे. त्यामुळे हे नाव अचूक आहे.