नगसेवक ते संभाव्य खासदार.. 10 वर्षात एवढी मोठी झेप घेणारे नरेश म्हस्के आहेत तरी कोण? CM शिंदे कनेक्शनची चर्चा

Loksabha Election 2024 Who Is Naresh Mhaske: ठाण्यासारख्या राजकीय दृष्ट्या अंत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून अनेक आजी-माजी आमदार, खासादरांच्या नावाची चर्चा असताना सर्वांना धोबीपछाड देत शिंदे गटाकडून उमेदवारीची शर्यत जिंकणारे नरेश म्हस्के नेमके आहेत तरी कोण हे पाहूयात...

Swapnil Ghangale | May 01, 2024, 11:43 AM IST

सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेचामध्ये नरेश म्हस्केंना नगरसेवक झाल्यानंतर अवघ्या 10 वर्षांमध्ये खासदारकीच्या उमेदवारीची लॉटरी लागली आहे अशी चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात आहे.

1/13

Who Is Naresh Mhaske

महायुतीच्या जागावाटपामधील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.   

2/13

Who Is Naresh Mhaske

नरेश म्हस्केंबरोबरच कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती शिंदे गटाने पत्रक जारी करुन दिली आहे.   

3/13

Who Is Naresh Mhaske

ठाण्यामधून आमदार प्रताप सरनाईकांपासून ते भाजपाचे आमदार संजय केळकर, संजीव नाईक यासारख्या अनेक दिग्गजांच्या नावांची चर्चा होती. मात्र त्या सर्वांना धोबीपछाड देत उमेदवारीची शर्यत जिंकणारे नरेश म्हस्के नेमके आहेत तरी कोण हे पाहूयात...  

4/13

Who Is Naresh Mhaske

नरेश म्हस्के हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे ठाण्यातील नेते आहेत. नरेश म्हस्के यांनी नगरसेवक पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 

5/13

Who Is Naresh Mhaske

2012 साली नरेश म्हस्के पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर पुन्हा 2017 साली ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले.  

6/13

Who Is Naresh Mhaske

2017 साली नरेश म्हस्के महानगरपालिकेमध्ये सभागृह नेतेपदी नियुक्त झाले. यावेळेस ठाण्यामध्ये शिवसेनेचं काम तत्कालीन मंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच काम केलं जात होतं.   

7/13

Who Is Naresh Mhaske

2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर निवडणुकीमध्ये उमेदवारच जाहीर केला नाही. त्यामुळे नरेश म्हस्के बिनविरोध महापौर म्हणून निवडून आले. त्यानंतर ते पुढे तीन वर्षा महापौर राहिले.  

8/13

Who Is Naresh Mhaske

2019 साली ते ठाणे महानगरपालिकेमध्ये नरेश म्हस्के शिवसेनेचे महापौर झाले. ते नोव्हेंबर 2019 ते मार्च 2022 दरम्यान ठाण्याच्या महापौर पदी होते.   

9/13

Who Is Naresh Mhaske

नरेश म्हस्केंनंतर मिनाक्षी शिंदे महापौरपदी नियुक्त झाल्या. सध्या हे दोघेही शिंदे गटामध्ये आहेत. मिनाक्षी शिंदे या शिंदे गटाच्या महिला आघाडीचं नेतृत्व करतात.

10/13

Who Is Naresh Mhaske

2022 मध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर नरेश म्हस्के एकनाथ शिंदें गटात सहभागी झाले. नरेश म्हस्केंच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेमधील जवळपास सर्वच माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. 

11/13

Who Is Naresh Mhaske

नरेश म्हस्केंवर शिंदे गटाकडून शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच त्यांना शिंदे गटाचं प्रवक्ते पदही देण्यात आलं. त्यांच्याकडे शिंदे गटाच्या ठाणे - कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

12/13

Who Is Naresh Mhaske

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील राजकारणाचा विचार केल्यास नरेश म्हस्के त्यांचा उजवा हात आहेत. शिंदेंचे सध्याच्या घडीला ठाण्यातील सर्वात विश्वासू सहकारी म्हणून नरेश म्हस्केंकडे पाहिलं जातं.   

13/13

Who Is Naresh Mhaske

सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेचामध्ये नरेश म्हस्केंना नगरसेवक झाल्यानंतर अवघ्या 10 वर्षांमध्ये खासदारकीच्या उमेदवारीची लॉटरी लागली आहे अशी चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात आहे.