फरहान अख्तरच्या 'या' 5 भूमिका, आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडतात

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आज 51 वा वाढदिवस साजरा करतोय. अभिनेत्याच्या या पाच भूमिका तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. चाहत्यांना देखील प्रचंड आवडतात. जाणून घेऊयात

| Jan 09, 2025, 12:51 PM IST
1/7

फरहान अख्तर

अभिनेता फरहान अख्तर त्याच्या चित्रपटांसाठी आणि त्यामधील दमदार भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

2/7

दमदार भूमिका

ज्यामध्ये रॉक ऑन, जिंदगी ना मिलेगी दोबारा, भाग मिल्खा भाग, द स्काई इज पिंक, तूफान यांसारख्या चित्रपटांमधील दमदार भूमिकांसाठी त्याला ओळखले जाते. 

3/7

रॉक ऑन

अभिनेता फरहान अख्तरने अर्जुन रामपालसोबत 'रॉक ऑन' चित्रपटामध्ये काम केलं आहे. या चित्रपटात अभिनेत्याने आदित्य श्रॉफची भूमिका साकारली होती. 

4/7

भाग मिल्खा भाग

या चित्रपटामधील अभिनेत्याची मिल्खा सिंगची भूमिका खूपच चर्चेत होती. यामध्ये फरहान अख्तरसोबत योगराज सिंह, दिव्या दत्ता, सोनम कपूर यांनी काम केलं होते. 

5/7

जिंदगी ना मिलेगी दोबारा

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटात अभिनेत्याने ह्रतिक रोशन, कतरिना कैफ, अभय देओल आणि कल्की यांच्यासोबत काम केलं आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. 

6/7

तुफान

2021 मध्ये 'तुफान' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्याने बॉक्सर अजीजची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना त्याची भूमिका प्रचंड आवडली होती. 

7/7

द स्काई इज पिंक

प्रियंका चोप्रासोबत फरहान अख्तरने 'द स्काई इज पिंक' या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटातील नरेन आणि अदितीची भूमिक प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.