40+ एकर जमीन, 8 घरं, 5 लाखांची गुरं अन् एकूण संपत्ती.. सुरेश धस किती श्रीमंत आहेत पाहिलं का?

Suresh Dhas Property: प्रसारमाध्यमांपासून ते सोशल मीडियावर सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे, ते नाव म्हणजे आमदार सुरेश धस! याच पार्श्वभूमीवर हा आमदार किती श्रीमंत आहे हे पाहूयात या फोटोगॅलरीच्या माध्यमातून....

| Jan 09, 2025, 12:39 PM IST
1/22

sureshdhasproperty

महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सद्या केंद्रस्थानी असलेल्या काही नेत्यांपैकी एक म्हणजे सुरेश धस! शेती हा आपला मूळ व्यवसाय असल्याचं सांगणाऱ्या भाजपाच्या आष्टी मतदारसंघातील या आमदाराच्या एकूण संपत्तीचा आकडा पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या चर्चेत असलेल्या सुरेश धसांच्या संपत्तीच्या तपशीलावर नजर टाकूयात...

2/22

sureshdhasproperty

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज म्हणजेच 9 जानेवारी रोजी एक महिना उलटला आहे. या हत्याकांडाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा आहे. 

3/22

sureshdhasproperty

त्याचबरोबर मागील महिन्याभरापासून राज्यात आणखी एक नाव चर्चेत आहे. ते नाव म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस!

4/22

sureshdhasproperty

संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी मागील चार ते पाच आठवड्यांपासून सार्वजनिक मंच असो किंवा प्रसारमाध्यमे असो अगदी सातत्याने आवाज उठवणारा चेहरा म्हणून सुरेश धस यांचं नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं आहे.

5/22

sureshdhasproperty

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष धस प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला 31 डिसेंबर रोजी ताब्यात घेण्यात आलं. याच मुद्द्यावरुन धस यांनी धनंजय मुंडेंबरोबरच या प्रकरणामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं. आता मागील काही दिवसांपासून ते सातत्याने अजित पवार आणि पंकजा मुंडेचं नाव घेताना दिसत आहेत.

6/22

sureshdhasproperty

वाल्मिक कराडची सखोल चौकशी करुन या प्रकरणामगील खरे चेहरे कोण आहेत हे शोधण्याची गरज धस यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. वाल्मिक कराडची संपत्ती 1500 कोटी रुपये असल्याच आरोप धस यांनी केल्यानंतर काही दिवसांपूर्वी बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी ईडीने दोन महिन्यांपूर्वीच कराडला नोटीस पाठवल्याचं समोर आलं आहे.  

7/22

sureshdhasproperty

वृ्त्तवाहिन्या असो, युट्यूब असो, पेपरमधील बातम्या असो किंवा सोशल मिडिया असो सगळीकडे धस यांचं नाव चर्चेत आहे. अनेकांवर बेहिशोबी मालमत्तेचा आरोप करणाऱ्या धस यांच्याकडे किती मालमत्ता आहे माहितीये का? धस यांच्याकडे किती जमीन आहे? त्यांच्या नावावर किती सोनं आहे? शेअर्समध्ये किती पैसे आहेत याचा तपशील त्यांनीच विधानसभेला दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाबरोबरच्या प्रतिज्ञापत्रात दिला आहे.

8/22

sureshdhasproperty

सुरेश धस हे 54 वर्षांचे असून त्यांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतल्याचं सांगितलं आहे. आपण शेतकरी असल्याचंही धस यांनी या प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. 1992-93 मध्ये आपल्याला बीएची पदवी मिळाल्याचं धस यांनी नमूद केलं आहे.

9/22

sureshdhasproperty

प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या दिवशी धस यांच्याकडे 50 हजार तर त्यांची मुलं आणि पत्नीकडे एकूण 75 हजार अशी 1 लाख 25 हजारांची रोख रक्कम होती.

10/22

sureshdhasproperty

सुरेश धस यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आष्टीमधील शाखेबरोबरच मुंबईतील शाखेमध्येही पैसे आहेत. आयडीबीआय आणि अन्य एका सहकारी बँकेतही त्यांचं खातं आहे. धस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर बँकेत एकूण 27 लाख 77 हजार रुपये जमा आहेत.

11/22

sureshdhasproperty

जयदत्त अॅग्रो, ओवॅसीस फार्म प्रोडक्ट, श्री साई राम शुगर, नवाबी रिसोर्सेस यासारख्या कंपन्यांमध्ये सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर शेअर्स आणि बॉण्ड्स आहेत. या शेअर्सचं बाजारमूल्य 7 कोटी 98 लाख 96 हजार इतकं आहे.

12/22

sureshdhasproperty

सुरेश धस यांच्या नावावर राष्ट्रीय बचत योजना किंवा पोस्टात पैसे नसले तरी त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर एनएसएस आणि पोस्ट बचत खात्यांचे एकूण 43 लाख 26 हजारांहून अधिक रुपये आहेत. धस यांची फ्यूचर जनरलअली इन्सोरन्स पॉलिसी असून ती 2 लाख 94 हजारांची आहे. कुटुंबियांच्या विमा पॉलिसींचा विचार केल्यास धस कुटुंबाकडे 13 लाख 28 हजारांच्या विमा पॉलिसी आहेत.

13/22

sureshdhasproperty

सुरेश धस यांच्या मुलाने घरासाठी दीड कोटींचं कर्ज घेतल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. सुरेश धस यांच्याकडे स्वत:ची फोर्ड एन्डेव्हर, एमजी ग्लोस्टर या दोन आलिशान गाड्या असून मुलाकडेही फोर्डची एन्डेव्हर कार आहे. धस कुटुंबाकडे एकूण 40 लाख मुल्याची वाहनं आहेत.

14/22

sureshdhasproperty

सुरेश धस यांनी स्वत:कडे 48 हजारांचं सोनं असल्याचं सांगितलं असून घरच्यांकडे म्हणजेच पत्नी आणि दोन्ही मुलांकडे एकूण पावणे 24 लाखांचं सोनं आणि चांदीचे दागिने आहेत. धस कुटुंबाकडे एकूण 24 लाख 26 हजारांचे दागिने आहेत.

15/22

sureshdhasproperty

सुरेश धस यांनी आपल्याकडे पाच लाखांच्या गायी-म्हशी असल्याचं सांगितलं असून पत्नीच्या नावावरील गुरांची किंमत एक लाख रुपये अशी एकूण 6 लाखांची गुरं असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.  

16/22

sureshdhasproperty

धस कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता 11 कोटी 9 लाखांपेक्षा अधिक आहे. त्याचप्रमाणे स्वत: सुरेश धस यांच्या नावावर शेत जमीनीचे सहा तुकडे असून त्याचं एकूण क्षेत्रफळ हे 13 एकरच्या आसपास आहे.   

17/22

sureshdhasproperty

सुरेश धस यांच्या पत्नीच्या नावावर एकूण 7 आणि मुलांच्या नावावर 2 शेत जमीनीचे तुकडे आहेत. घरच्यांकडे असलेल्या जमीनीच्या तुकड्यांचं एकूण क्षेत्रफळ हे 30 एकरपेक्षा जास्त आहे. म्हणजेच धस कुटुंबाकडे 42 एकरांहून अधिक जमीन आहे. या शेत जमीनीचं मूल्य 3 कोटी 80 लाख  99 हजारांहून अधिक आहे.

18/22

sureshdhasproperty

बिगर शेती म्हणजेच नॉन अॅग्रीकल्चरल लॅण्डबद्दल बोलायचं झालं तर धस कुटुंबाकडे एकूण 18 कोटी 60 लाख रुपये किंमतीची मालमत्ता आहे. धस यांच्याकडे स्वत:च्या नावावर 4 घरं आहेत.  

19/22

sureshdhasproperty

सुरेश धस यांच्याकडील चार घरांबरोबरच पत्नी आणि मुलांच्या नावावरही एकूण चार घरं आहेत. धस कुटुंबियांकडील 8 घरांची किंमत 3 कोटी 43 लाख 9 हजार रुपये इतकी आहे. धस कुटुंबाकडील स्थावर मालमत्तेची एकूण किंमत 25 कोटी 84 लाखांहून अधिक आहे. त्यापैकी एकट्या धस यांच्या नावावर 9 कोटी 35 लाख 25 हजारांची स्थावर संपत्ती आहे.  

20/22

sureshdhasproperty

सुरेश धस यांनी एचडीएफसीकडून दोन टप्प्यांमध्ये एकूण 32 लाख 44 हजारांचं कर्ज घेतलं आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर 3 कोटी 32 लाखांचं कर्ज आहे. धस कुटुंबावरील एकूण कर्जाची रक्कम 3 कोटी 65 लाख 37 हजार इतकी आहे.

21/22

sureshdhasproperty

म्हणजेच महाराष्ट्रभर नाव गाजत असलेल्या सुरेश धस यांची एकूण संपत्ती 36 कोटी 93 लाख 94 हजार 182 रुपये इतकी आहे. तर धस यांच्यावर 3 कोटी 65 लाख 37 हजार 605 रुपयांचं कर्ज आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये धस यांच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत, असंही प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.  

22/22

sureshdhasproperty

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या विधानसभेला जाहीर केलेल्या माहितीमध्ये प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 13 कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं आहे. याचाच अर्थ धस यांच्याकडे फडणवीसांच्या जवळपास तिप्पट संपत्ती आहे. विधानसभा लढणाऱ्या सर्व उमेदवारांची प्रतिज्ञापत्र ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पाहायला मिळतात. (सर्व फोटो - सुरेश धस यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन साभार)