Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : मी शपथ घेतो की...! फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात 'हे' अजित पवारांचे शिलेदार
Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : आज (15 डिसेंबर) महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातील राजभवनावर पार पडला. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 19 यात 3 राज्यमंत्री, शिवसेना एकूण 11 यात 2 राज्यमंत्री तर राष्ट्रवादीतून 9 यात 1 राज्यमंत्री अशा एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर नागपुरात झालेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 शिलेदारांनी शपथ घेतली.
1/9
हसन मुश्रीफ
अल्लाह साक्ष शपथ घेतो की, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असून मुश्रीफ यांनी महाराष्ट्र सरकारचे कामगार मंत्री म्हणून काम पाहिलंय. 2004 पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय खात्यांचे मंत्री, अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री होते.
2/9
धनंजय मुंडे
एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी कृषीमंत्री म्हणून काम पाहिलं. मुंडे 2019, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून विजयी झाले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आहेत. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री म्हणून आणि यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद भूषविले होतं.
3/9
दत्ता भरणे
4/9
आदिती तटकरे
रोहाच्या आदिती सुनील तटकरे यांनी दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. ठाकरे सरकार 2019 - 2022 मध्ये आणि 2023 पासून शिंदे सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. महिला आणि बाल विकास कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी लाडकी बहीण ही योजनेला गावागावात पोहोचवलं. वडील सुनील तटकरेंकडून त्यांना लहानपणापासून राजकारणाचे बाळकडू मिळाले.
5/9
माणिकराव कोकाटे
अॅड. माणिकराव कोकाटे सिन्नरमधून पाच वेळा आमदार झाल्यानंतर फडणवीस फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतलीय. कोकाटे यांनी 1999, 2004 मध्ये शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता. 2014 मध्ये त्यांनी भाजकडून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2019 ची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेकडून लढवत विजय मिळवला होता. यंदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी करतांना त्यांनी शरद पवार गटाच्या उदय सांगळेंना पराभूत करत पाचव्यांदा विजय मिळवला.
6/9
नरहरी झिरवाळ
7/9
बाबासाहेब पाटील
8/9
इंद्रनील नाईक
इंद्रनील नाईक हे दोन वेळा आमदारकीनंतर फडणवीस सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतलीय. पुसद मतदारसंघात 72 वर्षे एकाच कुटुंबातील आमदार मिळाला आहे. दोन मुख्यमंत्रीही या घरातील होते. पहिले म्हणजे महाराष्ट्राचे 11 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक आणि दुसरे म्हणजे सुधाकरराव नाईक. याच घराण्यातील इंद्रनील नाईक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदा पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचले आहेत.
9/9