रात्री कशी दिसते भारत-पाकिस्तानची बॉर्डर, एका व्यक्तीने शेअर केला फोटो

रात्रीच्या वेळी भारत-पाकिस्तानची बॉर्डर कशी दिसते हे तुम्ही कधी पाहिले आहे का? सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीने दोन्ही बॉर्डरचा फोटो शेअर केलाय. 

Soneshwar Patil | Dec 15, 2024, 16:18 PM IST
1/7

भारत-पाकिस्तान बॉर्डर

नेहमी भारत-पाकिस्तानच्या सीमा वाद चर्चेत असतो. पण तुम्ही दोन्ही देशाची सीमा कधी रात्री पाहिली आहे का? 

2/7

फोटो शेअर

नसेल तर आता या दोन्ही सीमा रात्री कशा दिसतात याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने हे फोटो शेअर केलेत.   

3/7

अमृतसर

या व्यक्तीचे फ्लाइट अमृतसरवरून जाताना  त्याने भारत -पाकिस्तानच्या सीमेचा आकाशातून हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. 

4/7

लखलखणारी लाईन

या व्हिडीओमध्ये एक किनारा दिसतो आहे. त्याचबरोबर खास म्हणजे या व्हिडीओत एक प्रकाशाने लखलखणारी लाईन दिसत आहे.

5/7

अमोल बत्रा

अमोल बत्रा नावाच्या युजरने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. 

6/7

35 हजार फूट

अमोल ने हा व्हिडीओ रेकॉर्ड करताना म्हटले आहे की, हा व्हिडीओ त्याने 35 हजार फूट उंचीवरून रेकॉर्ड केला आहे. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान बॉर्डरचे दृश्य दिसत आहे. 

7/7

कमेंट्सचा वर्षाव

व्हिडीओमध्ये सीमेवर लाईट दिसत आहे. जे पाहून लोक म्हणत आहेत की हे लाईट भारताने लावले असावेत. सध्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.