शिंदे, ठाकरे, BJP ला एकाच वेळी नडणारे सरवणकर किती श्रीमंत? 28 लाखांची कार, 2 फ्लॅट्स अन् एकूण संपत्ती...

Maharashtra Assembly Election Sada Sarvankar Property Net Worth: विरोध होत असतानाही सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना अर्ज भरत अमित ठाकरेंविरुद्ध शड्डू ठोकला आहे. थेट राज ठाकरेंच्या लेकाला आव्हान देणाऱ्या या शिवसैनिकाची एकूण संपत्ती किती आहे माहितीये का?

| Oct 30, 2024, 11:45 AM IST
1/16

sadasarvankarproperty

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला अल्टीमेट, राज ठाकरेंच्या पुत्राविरोधातील उमेदवारी मागे घेण्याचा असलेला दबाव, भाजपाकडून महायुतीमधील पक्षाऐवजी राज ठाकरेंच्या पुत्राला दिला गेलेला पाठिंबा या साऱ्याला तोंड देत उमेदवारी अर्ज भरणाऱ्या सदा सरवणकरांची एकूण संपत्ती किती पाहिलं का?

2/16

sadasarvankarproperty

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माहिमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंविरुद्ध निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

3/16

sadasarvankarproperty

निवडणूक न लढण्याचा दबाव असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला.   

4/16

sadasarvankarproperty

उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याबरोबर शिंदेंच्या पक्षाचे कोणतेही नेते नव्हते. अर्ज भरायला जाताना भाजपाचे तीन स्थानिक नेत्यांनी सरवणकर यांना सोबत केली.  

5/16

sadasarvankarproperty

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, भाजपचे विलास आंबेकर, सचिन शिंदे अर्ज दाखल करताना सरवणकरांबरोबर होते.   

6/16

sadasarvankarproperty

सरवणकर यांनी अर्ज दाखल केल्यानंतर रॅली काढून शक्तीप्रदर्शन करत आपल्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात होता असं म्हटलं आहे.   

7/16

sadasarvankarproperty

मात्र एकाच वेळी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंबरोबर भारतीय जनता पार्टीच्या विरोधाला न जुमानता निवडणुकीच्या रिंगात उतरलेल्या सदा सरवणकरांची संपत्ती किती आहे माहितीये का? चला पाहूयात...  

8/16

sadasarvankarproperty

सदा सरवणकर यांनी त्यांच्याकडे एकूण 25 हजार 682 रुपये रोख रक्कम असल्याचं प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. 

9/16

sadasarvankarproperty

बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, सारस्वत बँकेत त्यांची खाती आहेत. पाच कंपन्यांमध्ये तसेच संस्थांमध्ये आपली भागिदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  

10/16

sadasarvankarproperty

आपल्याकडे टोयोटा फॉर्च्युनर असून ती 28 लाखांची असल्याचं सदा सर्वणकरांनी म्हटलं आहे.   

11/16

sadasarvankarproperty

कोणत्याही प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने आपल्याकडे नाहीत असं सरवणकरांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

12/16

sadasarvankarproperty

आपल्या नावे कोणतीही शेतजमीन नसल्याचं सांगतानाच माहीममध्ये दोन फ्लॅट असल्याचं सरवणकरांनी म्हटलं आहे. खरेदीच्या वेळी या फ्लॅटची किंमत 1 कोटी 35 लाख इतकी होती असं त्यांनी म्हटलं आहे. सध्या या संपत्तीची किंमत 4 कोटी असल्याचं ते म्हणालेत.   

13/16

sadasarvankarproperty

सरवणकरांकडे एकूण जंगम मालमत्ता 5 कोटी 35 लाख रुपये इतकी आहे. 

14/16

sadasarvankarproperty

तर सरवणकरांकडील स्थावर मालमत्ता 1 कोटी 35 लाख 75 हजार रुपये इतकी आहे. तर जंगम मालमत्ता 5 कोटी 35 लाख इतकी आहे.   

15/16

sadasarvankarproperty

सरवणकरांवर 11 लाख 98 हजार इतकं कर्ज आहे. 

16/16

sadasarvankarproperty

ढोबळ मानाने सदा सरवणकरांकडील एकूण संपत्तीचा आकडा 7 कोटी 70 लाखांपेक्षा अधिक असून त्यांच्याकडे 28 लाखांची कारही आहे.